पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील कृषिराज साखर कारखान्याने 1 लाख टन उस गाळपाचे उद्धिष्ट ठेवले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा कै. राजुबापू पाटील यांच्यावर मोठा विश्वास होता, त्या विश्वासाला तडा न जाऊ देता चालू गाळप हंगामात कारखान्याला गाळपासाठी येणाऱ्या उसाला इतर कारखान्या प्रमाणे दर देणार असल्याचे कृषिराज शुगर कारखान्याचे कार्यकारी संचालक अॅड. गणेश पाटील यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ह.भ.प. जयवंत महाराज बोधले महाराज म्हणाले की, राजुबापू पाटील यांनी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन कारखान्याची उभारणी केली.शेतकरी हा केंद्रबिंदु मानून राजकरण केले, तीच परंपरा गणेश पाटील आणि पाटील परिवार अखंडित ठेवतील.
यावेळी ह.भ.प. जयवंत महाराज बोधले, भोसे विकास सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, माजी उपसरपंच शेखर (भैय्या) पाटील, सहकार शिरोमणीचे संचालक दिनकर कदम, जि.प. सदस्य अतुल खरात, शहाजीराव पाटील, यशवंतभाऊ पाटील पत संस्थेचे अध्यक्ष जयवंत गावंधरे, सरपंच आदिनाथ देशमुख, माऊली कोरके, महादेव पाटील आदी मान्यवर व शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.