सोलापुरातील बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा उद्ध्वस्त



सोलापूर // प्रतिनिधी 

बनावट नोटा छापणा-या दोन तरुणांना विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोन तरुणांकडून घरी बनावट नोटा प्रिंटर आदी साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी झाली. त्या दोघांनी आतापर्यंत किती बनावट नोटा छापल्या आणि त्यांनी या नोटा कोणाकोणाला सप्लाय केल्या याबाबतची अधिक माहिती पोलिस घेत आहेत.    विष्णू सिद्राम गायधनकर ( वय ३५,रा. भारत हौसिंग सोसायटी सदर बाजार सोलापूर,) व संजय धनु पवार ( वय ३५, रा. कुमठा तांडा उत्तर सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी शंभर रुपयाच्या ६१० व पाचशे रुपयाच्या ५०० नोटा अशा एकूण १११० नोटा कारवाईदरम्यान जप्त केल्या आहेत. तसेच नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget