तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय व मंडळ तेलुगु भवन बांधकाम विषयी चर्चासत्र उत्साहात संपन्न




सोलापूर // प्रतिनिधी 

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय मंडळाच्या वतीने तेलगू भवन बांधण्यासाठी आमदार प्रणितीताई शिंदे यांनी शासनाकडून 93 लाख रुपये निधी मिळवून दिले. आज रोजी सोलापूर शहरातील सर्व तेलगू भाषिक समाजबांधवांचा श्रीकृष्ण मंगल कार्यालय कमटम वसाहत येथे तेलगू भवन बांधकाम विषयी चर्चासत्र आयोजित केले होते. सदर चर्चासत्रांमध्ये सर्व तेलगू भाषिक समाज बांधवांनी आपले विचार मांडले व तेलगु भवन होत असल्याबद्दल प्रत्येकांनी मनापासून आनंद व्यक्त केला कित्येक वर्षापासून असलेला स्वप्न साकार होत आहे. तेलुगु भवन भव्य दिव्य असायला पाहिजे म्हणून अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्व कार्यक्रम आनंदात पार पाडले. आणि लवकरच तेलगु भवन चा भूमिपूजन समारंभ मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.

सर्व समाजाचे अध्यक्ष व सेक्रेटरी माजी अध्यक्ष श्री जनार्दन कारमपुरी, श्री देवेंद्र भंडारे, रामकृष्ण उदगिरी, नारायण काळपगार, प्रवीण मुसपेठ, राजकुमार सरवदे, दीनानाथ धुळम, अंबाजी गुर्रम, मुरलीधर आरकाल, माजी नगरसेवक महापौर संजय हेमगड्डी, रामचंद्र जन्नू,  प्रकाश कोंडम, व्यंकटेश कोंगारी, मेघनाथ येमूल, राजमहेद्र कमटम, पांडुरंग दिड्डी, सौ. कुमुदिनी अंकाराम, विट्ठल बड़गंची, संतोष उदगिरी, तसेच प्रतिष्ठित व्यापारी उद्योजक अंबादास बिंगी, यल्लप्पा येलदी, श्रीनिवास क्यातम, गोपीकृष्ण वड्डेपल्ली, देविदास गुंडेटी, गोवर्धन कमटम, श्रीनिवास विडप, भूपती कमटम, अंबादास कुडक्याल, रमेश कैरमकोंडा, रघुरामुलु कंदीकटला, लक्ष्मीनारायन कमटम, यशवंत इंदापूरे, तिरुपती परकीपंडला, मल्लेशम येमूल, दयानंद कोंडाबत्तीन, महाकांली येलदी, नारायण मेरगु, राहुल गंजी, व इतर सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम, यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव तिपण्णा गणेरी यांनी मानले सूत्रसंचालन रेणुका बुधाराम व प्रभाकर भीमनाथ मधुप्रिया महिन्द्रकर, यांनी मानले. सुरवातीस तेलगू मातल्लिकी मल्लेपुलू दंडालू या गीताने सुरुवात करण्यात आले. तसेच यावेळी ज्येष्ठ गायक एस. पी. बालसुब्रम्हन्यम यांच्या निधनानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याप्रसंगी पेंटप्पा गड्डम व इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले संस्थेचे पदाधिकारी श्रीनिवास गाली, श्रीनिवास यनगंदुल, संजीव नादरगी, ग्रंथपाल स्वाती कोंडूर, अंबादास फलमारी, आदी उपस्थित होते


Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget