सोलापूर // प्रतिनिध
कोरोना लाॅकडाऊनकाळामध्ये ज्या महिला बचत गटांचे उद्योग व्यवसायाचे फार मोठे नुकसान झाले आहे. अशा सर्व महिला बचत गटांचे संपूर्ण कर्ज माफ व्हावे यासाठी दिनांक 29 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा शाडो कॅबिनेट मंत्री दिलीप (बापू) धोत्रे यांनी पंढरपूर येथे भव्य असा महिलांचा मोर्चा काढला होता त्याच अनुषंगाने दिनांक ३ रोजी या मोर्चाची दखल घेत पुणे विभागीय आयुक्त डॉ सौरभ राव यांनी तात्काळ ही कर्ज वसुली थांबवावी व कोणत्याही बचत गटांच्या महिलांना कोणत्या मायक्रो फायनान्स कंपनीने त्रास देऊ नये यासाठी आदेश काढले होते त्यानंतर आज मनसेचे प्रदेश सरचिटणीस व शाडो कॅबिनेट मंत्री दिलीप (बापू) धोत्रे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना पत्र लिहून हि सर्व माहिती कळवली आहे.
यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी पत्रामध्ये सांगितले आहे की गेली सात सात महिने झाले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे लॉक डाऊन होता. या काळामध्ये महिला बचत गटाने मायक्रोफायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय करण अशक्यप्राय होतं तर या माता-भगिनी कर्जाचे हप्ते कुठून भरणार त्यातच आर्थिक आरिष्ट यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील महिला बचत गटांचे व्यवसाय जवळजवळ ठप्प झाले होते त्यामुळे अर्थातच मायक्रोफायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले पण या परिस्थितीचा कसलाही विचार न करता काही फायनान्स कंपन्यांनी ग्रामीण महाराष्ट्रामध्ये दंडेलशाही सुरू केली आहे.
कर्जदाराच्या घरी जाऊन दमदाटी करणे त्यांचा अपमान करणे असले प्रकार ग्रामीण भागामध्ये सुरू आहेत या सर्व मायक्रो फायनान्स कंपन्यांवर सरकारने अंकुश ठेवायला हवा कर्जदारांच्या घरी जाऊन त्यांची अब्रू चव्हाट्यावर आणण्याचा अधिकार या कंपन्यांना कोणी दिला असा प्रतिप्रश्न राजसाहेब ठाकरे यांनी यावेळी केला आहे? ह्या सर्व गोष्टी बंद होणार नसतील तर माझ्या मनसैनिकांना त्यांच्या पद्धतीने काम करावे लागेल हे व असे अनेक मुद्दे या पत्रामध्ये हे राज साहेबांनी मांडले आहेत.
त्याचबरोबर ज्या माता भगिनींचे या मायक्रो फायनान्स कंपनीने विमा उतरवला आहे. त्या विम्याची रक्कम त्यांना अदा करण्यात यावी तुझे त्या विम्याची सर्व कागदपत्रे त्या सर्व महिला बचत गटांच्या माता-भगिनींना देण्यात यावीत अशी मागणी यावेळी राजसाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे केली आहे



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.