सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षकपदी तेजस्वी सातपुते यांची नियुक्‍ती.



सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची नगरला बदली झाली आहे. त्यांच्या रिक्‍तजागी आता साताऱ्याच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. गृह विभागाने (बुधवारी) चार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. 


भारतीय पोलिस सेवेतील अशोक दुधे यांची बदली होऊनही त्यांना पदभार मिळालेला नव्हता. त्यांची रायगडच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. तर तेजस्वी सातपुते यांच्या सोलापुरातील बदलीनंतर अजयकुमार बन्सल यांची नियुक्‍ती साताऱ्याच्या पोलिस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. जळगावचे सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांची बदली झाली असल्याची माहिती मिळत आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget