‘महाविकास आघाडीच्या कुटुंबात खडसेंचे स्वागत’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

भाजपाचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) प्रवेशाबद्दलची चर्चा अखेर खरी ठरली आहे. काही वेळेपूर्वीच खडसेंनी भाजपचा राजीनामा दिला असून, येत्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची अधीकृत माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आताच दिली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनीही खडसेंच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

साध्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उस्मानाबादच्या दौऱ्यावर असून, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत आहेत. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हसतमुखाने खडसेंच्या निर्णयाचे स्वागत केले. ‘एकनाथ खडसे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) कुटुंबात येत आहेत. त्यांचे स्वागत आहे’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget