सोलापूर प्रतिनिधी:- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप(बापू) धोत्रे यांनी दिली भेट.या पूरग्रस्त गावातील अनेक माता भगिनींनी अडीअडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले
अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या भागात पूर आला त्यामुळे सर्व शेत जमिनी पुराच्या पाण्याखाली होती यामुळे शेतकऱ्यांचे कधी न भरून येणारे नुकसान झाले आहे तरी लवकरात लवकर सरकारने शेतकऱ्यास मदत करावी अशी मागणी करणार असल्याचे दिलीप (बापू) धोत्रे यांनी यावेळी ग्रामस्थांशी बोलताना सांगितले
यावेळी सरपंच सौ.मीनाक्षी गणेश भुसनर,माजी सरपंच दत्तात्रय कांबळे, गणेश भुसनर,माजी सरपंच अण्णासाहेब भुसनर,सुसेन भुसणर इत्यादी उपस्थित होते.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.