सत्ता कोणाचीही असो कारखाना सुरू होणे गरजेचे:खा.शरदचंद्रजी पवार






वृत्तसंस्था प्रतिनिधी :- आजरा साखर कारखाना सध्या संकटात आहे.यावर्षी ऊसाचे बंपर पीक असल्याने साखर कारखाना सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांची शिष्टमंडळाने भेट घेतली आणि या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी त्यांना नम्र विनंती केली.



 या विषयावर चर्चा सकारात्मक झाली. यावेळी मा.शरद पवार यांनी स्वतः मंत्री मा.ना. हसन मुश्रीफ यांना फोन करून कारखान्या संदर्भात योग्य ते निर्देश दिले. तसेच येत्या दोन दिवसात आजरा साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयन्त करण्याचे शिष्टमंडळाला आश्वासन दिले. त्यांनी पुढे ऊसाचे पीक जास्त असल्याने कारखाना सुरू करावा लागेल असेही शिष्टमंडळाला सांगितले. तसेच सत्ता कोणाचीही असो कारखाना सुरू होणे गरजेचे असून येत्या दोन दिवसांत कारखाना सुरू करण्याचे माझे प्रयन्त राहतील असे मा.शरद पवार यांनी शिष्टमंडळाला सांगितले. 


यावेळी अनुज केसरकर, आजरा साखर कारखाना कामगार संघाचे अध्यक्ष धनाजी किल्लेदार , उपाध्यक्ष संजय उतुरकर , सरचिटणीस रमेश देसाई , अकाउंटन्ट रमेश वांगणेकर उपस्थित होते. या शिष्टमंडळाला सकारात्मक आश्वासन मिळाले आहे.लवकरात लवकर आजरा साखर कारखाना निश्चितच सुरू होईल म्हणून या शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले असल्याचे अनुज केसरकर यांनी सांगितले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget