चार महिन्यानंतर पोपट पक्षी आला भेटण्यासाठी




जोतिषाने कातरले होते पंख दोन महिने केले प्राणी मित्राने संगोपन

वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

बंकलगी गावात सहा महिन्या पुर्वी  एक जोतिषी एका छोट्याशा पिंजरा मध्ये पंख कातरलेला पोपट घेऊन फिरत होता .(वन्यजीव कायदा अंतर्गत असे कृत्य  हा गुन्हा मानला जातो.) ही बाब वन्यजीव प्रेमी श्रीकांत बनसोडे ह्यांनी पाहिली व जोतिषास विरोध केला. जोतिषाने पिंजरा टाकुन तेथुन पोबारा केला. 

पंख कातरलेल्या पोपटास निसर्गात उडता येत नसल्याने श्रीकांत ह्यांनी त्या पोपटाचे दोन महिने आपल्या घरातच संगोपन केले .घरातील सर्वच सदस्यांचा काही दिवसातच पोपटावर लळा लागला. पंखाची पुर्ण वाढ होताच पोपटास निसर्गात मुक्त जीवन जगण्यासाठी सोडण्यात आले. चार महिन्यानंतर 

आज तोच पोपट दारासमोरील दोरीवर  बसुन ओरडताना दिसला. ह्याच दोरीवर त्याला संगोपन करत असताना बसण्याची सवय होती. पोपटाचा आवाज ऐकुन घरातील सदस्य घराबाहेर आले. आपलाच पोपट आहे का दुसरा ओळख पटण्यासाठी श्रीकांत चे वडील लक्ष्मण बनसोडे ह्यांनी माहित अशी जाणकार शिळ वाजवली. शिळ मारताच पोपट अगदी त्यांच्या जवळ येऊन बसला. हा क्षण पाहुन सर्वांचे चेहरे आनंदुन गेले. 

लक्ष्मण बनसोडे ह्यांनी पोपटास स्वहाताने खाद्य भरविले. काही काळ पोपट थांबला सर्वांची भेट घेऊन निसर्गात मुक्त जीवन जगण्यासाठी उडुन गेला.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget