पितृतुल्य नेतृत्व श्रद्धेय: स्व. सुधाकरपंत परिचारक





परीचारकांच्या वाड्यात 1935 साली दुर्गाष्टमीच्या  शुभमुहर्तावर  उमा आईच्या पोटी एका गोड बालकाचा जन्मझाला नाव सुधाकर रात्रीचा काळोख घालावीनाऱ्या  सुधाकरपंतांनी शेतकऱ्यांच्या जीवनातील दुःखाचा काळोख घालवित गोर गरीबांच्या जीवनात सुखरूपी अमृताचा अमृताचा शिडकावा करण्याची धडपड आयुष्यभर केली

पंढरी च्या पांडुरंगाला स्नान घालण्याचा आणि धुपारतिचा मान असलेल्या सेवाधारी परिचारक घराण्यात जन्मलेल्या सुधाकरपंतांनी पांडुरंगाच्या सेवेसोबतच माणसात पांडुरंग शोधला आणि 1958 साली पंढरीतील सर्वोदय समेलनापासून जनसेवेचा वसा घेतला तो शेवटपर्यंत जोपासला अगदी कोरोना महामारी मुळे पुणे येथे हॉस्पिटलला ऍडमिट असतानाही  पांडुरंग सह साखर कारखाना  सभासद शेतकऱ्यांना पोळापूर्व 200 रु प्रमाणे पैसे जमा करण्याच्या सूचना चेरमन या नात्याने दिल्या आणि शेवटच्या  श्वासालाही  शेतकरी रुपी पांडुरंगाला आपली सेवा रुजू केली

श्रीमंत,पंत आणि मालक या विविध नांवाने ओळकले जाणारे सूधाकरराव हे मनाचे मोठे श्रीमंत होते ,तर ते  सुसंस्कृत संस्कार व सुसंस्कृत विचारांचे अगदी पंडित पंत होते आणि शेतकऱ्यांच्या उसाला आधार देणारे  मालक होते

सधन कुटुंबात जन्माला येऊनही ऐशोआरामात जीवन घालविण्या पेक्षा गोरगरीब लोकांच्या  जगगण्यासाठी कष्टउपसण्यात जीवनाची धन्यता  मानली आहेस शेतकऱ्यांच्या कामासाठी ते वाडी वस्तीला पायी  चालत गेले तर सायकल,लुना व एसटी प्रवास करीत प्रसंगी पदरमोड करून जनतेची कामे केली आहेत पंतांनी सुरवाती पासूनच यशापयश पचविले आहे जसे ते अपयशयने कधी खचले नाहीत तसेच ते यशाने कधी मातले नाहीत राजकारणापेक्षाही त्यांना जनसेवेचे अधिक वेड होतें  सत्ता असो अथवा नसो जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी परिचारक वाड्याच्या ओसरीवर   सकाळी 7 पासून रातरी

 उशीरापर्यंत जणू जनता दरबारच भरलेला असायचा कोणताही औपचारिकपणा नसलेला हा जनता दरबार होता  मालकांच्या भेटही साठी ना pa  ची गरज  ना अपॉइंटमेंटची ना सुरक्षा रक्षकाचा ससेमिरा ना भेटीची धाकधूक ओसरीवर कामासाठी आलेलाा  माणुसनामाणुस  नाव गावासहीत मालकांना पाठ असायचा बाहेर न होणारी  आपली कामे इथे अगदी सहज झाल्याने  कामासाठी  आलेला माणूस तितक्याच सहजतेने मालकांच्या चरणाला स्पर्श करीत समाधानाने  परतायचा जनतेची कामे करताना त्यांनी कधीही आपला परका असा भेदभाव केला नाही म्हणूनच राजकरणात मालकांना विरोधक असतील ही पण वैरी नव्हते असे ते एकमेव लोककनेते होते

1975 मध्ये पंढरपूर अर्बन बँक सत्ता आल्या पासुन यात्रेवर अवलबुन असणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना  बँकेद्वारे  यात्रा प्रासंगिक  कर्जजाची व्यवसथा देऊन व्यापाराला आधार दिला याने छोट्या व्यापाऱयाची  खाजगी  सावकारपाशातून  ससुटका झाली,तर 1978 सोलापूर dcc  बँक चेरमन होताच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अर्थ साह्य केले आणि शेतकरी खाजगी खाजगी सावकाराच्या तावडीतून  सुटण्यास मदत झाली 

शेतकरी हित जपणाऱ्या पंतांनी आपला सहकारी साखर कारखाना प्रस्ताव असतानाही 1972/73 मध्ये सुरू झालेल्या  विठ्ठल सह साखर कारखान्यास  शेकरी हितासाठी स्वतःचा प्रस्ताव बाजुला ठेऊन मोठया  श्रीमंत मनाने  भाग भांडवल गोळा करण्या पासून शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न केला

1986 साली आजारी  भीमा सह  साखर कारखाना  प्रशासक म्हणून नियुक्ती होताच आपल्या हिमतीवर कर्ज उभारणी पासून ते कारखान्या पासून दुरावलेल्या उउत्पादक शेकऱ्यास विश्वास देत कारखान्यास ऊसमिळवीन्या पर्यंत मोठी धडपड करून  यशस्वी पणे कारखाना चलऊन कामगार आणि शेतकऱ्यांच्या चुली पेटवल्या आणि सहकार क्षेत्रात  नव्याने एक परिचारक प्याटर्न   निर्माण झाला व ते शंकराचे  डॉकटर झाले

सहकारावर त्यांचे प्रचंड प्रेम होते   हणूनच 1993 साली श्रीपुरचा खाजगी साखर कारखाना  विकत घेऊन त्याचे पांडुरंग सह साखर कारखान्यात रूपांतर केले आज त्याचा महाराष्ट्रासह देशभर लौकिक निर्माण आला आहे चरनु काका पाटील  यांचे विनंती वरून मंगळवेढ्याच्या दामाजी सह साखर करखा न्यास मोठे सहकार्य केले तर उर्वरित उसाची सोय लावण्यासाठी  युटोपीयन शुगर  निरमितीस मार्ग दर्शन केले एवढे साखर कारखाने जवळ असतानाही  त्यांच्यात कधीही  साखर सम्राटपणाचे वारे शिरले नाही आणि एकही संस्था बुडवली नाही  हेच सहकारातील त्यांचे वेगळेपण होते

1985 पासून सलग 25 वर्षे पंढरीचे आमदार असताना त्यांनी पंढरपूर शहरासह सम्पूर्ण तालुक्याच्या विकासा साठी प्रयत्न केले भुयारी गटारे,रस्ते,पाणी ही कामे प्राधान्याने  केली ग्रामीण भागातील महिलांची कुचंबणा  थाम्बविण्यासाठी शौचआलंय उभारणीस प्राधान्य दिले महाराष्ट्रात विरोधी पक्षाची सत्ता असतानाही  आपल्या लौकीकाच्या बळावर जनहित कामे आपल्या मतदार संघात खेचून आणली विधानसभा मधील ते फरडे वक्ते नव्हते पण शुद्ध चरणाचे एक मोठे नेते होतें त्यांच्या सुसंस्कृत आचरनामुळेच  सर्व आमदार त्यांना  पंढरीचा पांडुरंग  म्हणत असत

चार यात्रेवर जगणाऱ्या पंढरीत येर्वीच्याला  एखाद्या  माणसास दुसऱ्या एखाद्या  माणसाने काय  कसकाय? या प्रश्नास  निवांत आहे  हयाच उत्तराचे पालुपद गाणाऱ्या पंढरीला तालुक्यातशेतीला खात्रीचे पाणी घेत ऊस,डाळींब,बोर ,पेरू ,द्राक्ष ह्या पिका द्वारे हरित क्रांती घडविली  बेदाणे निर्मितीसप्रोचाहन दिलें  पंढरीच्या मार्केट यार्डात द्राक्ष,बेदाणा, डाळींबाचा खास बाजार निर्माण केला परिणामी पंढरीचा शेतकरी सधन झाला  तोच पैसे पंढरीच्या बाजारात इतरत्र ही फिरू लागला यातून एक अर्थ क्रांती झाली  आणिपंढरीच्या निवांत आहे या शब्दलाच निवांतपणे बाजूला केले तालुक्यातला शेकरी धडपड्या झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊनआत्महत्या प्रकार  महाष्ट्रातील इतर प्रमाणत  दुर्मिळ म्हणावी लागेल

पैशाच्या श्रीमंती बरोबरच विद्येचीही श्रीमंती निर्माण व्हावी म्हणून पांडुरंग शिक्षण मंडळाची स्थापना केलीतसेच कर्मयोगी विद्या निकेतन द्वारे उच्य शिक्षण गणेश सेवा मंडळ मार्फत मूकबधिर व मतिमंद विद्यालय सुरू केले प्राथमिक अवस्थेत नॉन ग्रांट विद्यल शिक्षक पगार पदरमोड करून भागविले आहेत पण कधीही शिक्षक सम्राटाच्या आवेशाने त्यांना पछाडले नाही 

अंडसजे 700कोटी तोटा आलेले st महामंडळ शरद पवार साहेबानी 

   विलासराव देशुख मुख्यमंत्री असताना दिले आणि  हातलाविल तिथं सोन अश्या आपल्या अमृत करांनी इथेही आपला काटकसरीचा परिचारक पॅटर्न  राबविला  आणि परिवर्तन बस,हात दाखवा बस थाबवा  कामगारात  विश्वास निर्माणकरून मोठे काम घडविले आणि सर्व तोटा भरून काढीत 2008 ला महामंडळ अध्यक्ष पद सोडताना 150 कोटी  रु नफ्यात महामंडळ आणले होतें 

वैयकतीक संसार न  थाटलेल्या मालकांनी  हजारो   कुटूंबाच्या जेवणाची आणि जीवनांची सोय केली आणि हजरोंच्या संसाराला हातभार लावला 

उतू नको मातू नको  घेतला वसा टाकू नको  या तत्वानुसारच केवळ आणि केवळ  मालकांनी  गरीब,निर्धन,दरिद्री, संकटात असलेल्याना  आधार देण्या साठीच  कृषी उत्पन्न बाजार समिती,अनेक ग्रामपंचाईत,सोडायट्या,बँका, जिल्हा परिषद, पंचायत समिती,दूध सोसायट्या, दूध पंढरी संघ, आनेक साखर कारखाने,शाळा यांचा वापर केला,या माध्यमातून भूकंप,चक्रीवादळ, सुनामी,दुष्काळ चारा छावणी, अतिवृष्टी,महापूर, नैसर्गिक आपत्ती, कारगिल वीरांनच्या कुटूंबाला  भरघोस मदत केली धार्मिक समारंभाला ते आवर्जून जात तसेच धार्मिक कार्यक्रमाला,सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमानाही ते मोठी मदत करत अश्या श्रीमंत मनाचे असणारे मालक सुसंस्कारित वर्तनाचे होते म्हणूनच राजकारना  सारख्या  घाणेरड्या डबक्यातही निर्मळ राहणारे राजकारनातील संत ठरतात 

त्याचा जयंती निमित्त भावपूर्ण आदरांजली

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget