सोलापूर // प्रतिनिधी
श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचा 40 गळीत हंगामाचा शुभारंभ आज दिनांक 25/10/2020 रोजी सकाळी 10:10 वाजता या शुभमुहूर्तावर ह भ प भागवत महाराज चवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत, श्री सुभाष वसंतराव भोसले, माजी नगराध्यक्ष, पंढरपूर यांचे अध्यक्षतेखाली तसेच श्री बाबा उर्फ प्रभाकर बाबुराव माजी नगराध्यक्ष पंढरपूर, श्री दिलीप (बापु) धोत्रे प्रदेश सरचिटणीस मनसे, श्री संजय शिवलाल कोकाटे शिवसेना नेते माढा विधानसभा आदी मान्यवरांच्या शुभहस्ते व कारखान्याची ज्येष्ठ सभासद श्री चांगदेव दत्तात्रय कदम, श्री नंदकुमार बाळकृष्ण पाटील, कालिदास रघुनाथ पाटील, मारुती राम पवार, माधव नारायण चव्हाण, नागनाथ ताआप्पा मोरे, नागनाथ मारुती गायकवाड, तानाजी बयाजी सावंत, शिवाजी- हुंगे-पाटील, उत्तम भागवत घाडगे, भीमराव सदाशिव पवार, बाबासाहेब सदाशिव हाके, दशरथ रघुनाथ पाटील, लक्ष्मण वामन पारेकर, राजू देवराव दगडे, दगडू दिगंबर भुसनर, रानबा केरबा शिंदे, आप्पा नारायण पवार, बलभीम आप्पा घाडगे, बाळासाहेब वासुदेव लामकाने, शंभूदेव चंद्रसेन बाबर तसेच कारखान्याचे चेअरमन, आमदार श्री भारत तुकाराम भालके व व्हाईस चेअरमन श्री लक्ष्मण नामदेव पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कलश पूजन कारखान्याची संचालक श्री दशरथ पंढरीनाथ खळगी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
स्वागत व प्रस्तविक भाषणात बोलताना कारखान्याचे चेअरमन, आमदार श्री भारत नाना भालके म्हणाले की, गेल्या शिजला कारखाना चालू झाला नाही, याची मोठी खंत मनामध्ये असून या वर्षी कारखाना पूर्ण संमतीने चालणार असून त्यासाठी लागणारी तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज असून गणितासाठी 25 हजार एकर उसाची नोंद झालेली असून त्यापासून अंदाजे 13 लाख मे.टनाचे गाळपाचे उद्दिष्ट आहे.
दोन-तीन दिवसात तोडणे वाहतुकीचे कमिशन वर डिपॉझिट चे बिल देणार असल्याने त्यांनी सांगितले, तसेच कर्मचाऱ्यांना ही दीपावली सनापूर्वी पगार देणार असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याकडील सर्व कर्जाची वेळेत परतफेड करू. यावर्षी ऊस पीक चांगली असताना अतिवृष्टीमुळे भीमा नदीला पूर आल्याने त्याची फार मोठे नुकसान झालेले असल्याने त्याचे उसाचे वेळ करून त्यांना मदत करून जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊस दर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व सभासद शेतकऱ्यांनी आपण पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गई तास देऊन गळीत हंगाम यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. कोणाच्या काळात सर्वांनी आपले आरोग्य सांभाळून आपली काळजी घ्यावी, असे आव्हानही आमदार भारत नाना भालके यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना श्री सुभाष वसंतराव भोसले म्हणाले की, कै. औदुंबरअण्णाच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच काटकसरीने आमदार भारत नाना भालके ही काम करीत आलेले आहेत. आमदार भारत नाना च्या काळात कारखान्याचे 7500 मे.टन विस्तारितकरण झालं, 30 हजार के.एल.पी. डिस्टलीरी उभा केली, 30 मे.वॅट क्षमतेचे सहवीज निर्मितीचे प्रकल्प उभा राहिला, सभासदांच्या 22 कोटी रुपयांच्या ठेवी परत केल्या, गेल्या सुजला कारखान्याचे नेटवर्क अधिक असताना भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आपल्या कारखान्यात पूर्वहंगामी कर्ज मिळू शकली नाही त्यामुळे कारखाना चालू झाला नाही, याची खंत आमदार भारत नाना यांना असून यापुढे कारखान्यास आमदार भारत नाना यांचे नेतृत्वाखाली चांगले दिवस येणार असून आपल्या पिकविलेल्या संपूर्ण ऊस आपल्या कारखान्यात गळफास घेऊन सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
सदर प्रसंगी बोलताना ह भ प भगत महाराज चोरीही आपल्या अध्यात्मिक शैलीमध्ये विचार व्यक्त करताना म्हणाली की, श्री विठ्ठल कारखान्यामागे फार मोठी अध्यात्मिक शक्ती असून, श्री विठ्ठल कारखान्याची निर्मिती, कै. औदुंबर आण्णा पाटील यांचे प्रेरणेतून झालेली असून श्रीविठ्ठल कारखान्याला आणिक साधू-संतांचे आशीर्वाद लाभले आहेत. श्री विठ्ठल कारखाना हे पंढरपुर तालुक्याची अर्थक्रांतीचे स्थान आहे. तालुक्याचे गतिमान नेतृत्व आमदार भारत नाना भालके ही जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असून श्री विठ्ठल कारखान्यांनी यांचे नेतृत्वाखाली उत्तुंग झेप घेतलेली आहे. एक अभ्यासू व प्रभावशाली लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा दबदबा आहे, असे सांगितले व गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सदर प्रसंगी बोलताना श्री संजय कोकाटे म्हणाले की, आमदार भारत नाना भालके यांचे महाराष्ट्रातील 40 साखर कारखान्यांना कर्ज मिळाले, त्यांच्या नेतृत्वाखाली श्रीविठ्ठल करण्याची फार मोठी प्रगती झाली असून यावर्षी जिल्ह्यातील सर्व कारखाना बरोबर उत्तर देऊ असे आ. भारत नाना नी आश्वासन दिले असून कारखान्या सहकार्य करू असे त्यांनी शेवटी सांगितले.
सदर प्रसंगी बोलताना पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री बबन अधटराव म्हणाले की, श्री विठ्ठल कारखाना पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आधारवड असून तो शेतकऱ्यांचा राजवाडा आहे. आज पर्यंत आमदार भारतनाना यांनी कारखान्याच्या माध्यमातून सर्व सभासद व जनतेचे हित जोपासली आहे असे त्यांनी सांगितले.
सदर प्रसंगी बोलताना म.न.से. प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे म्हणाले की, कारखाना वेळेत सुरू व्हावा यासाठी आमदार भारत नाना भालके यांनी कोरुना सुद्धा कारखान्यास पूर्वहंगामी कर्ज वेळेत मिळावे म्हणून सतत मुंबईला जाऊन पाठपुरवठा करून सभासद शेतकऱ्यांची व कामगारांची दिनी देऊन सर्व सभासद व जनतेचे हित जोपासले आहे असे त्यांनी सांगितले. सदर प्रसंगी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल एॅड. गणेश पांडुरंग पाटील यांचा सत्कार आमदार भारत नाना भालके यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
कारखान्याचे सर्व सभासदांचा दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. सोलापूर यांच्याकडून सभासद अपघात विमा योजने अंतर्गत विमा उतरविला असून दुर्दैवाने मयत झालेल कै. ज्ञानदेव रामचंद्र माळी, रा. उंबरे यांचे वारस पांडुरंग ज्ञानदेव माळी, रा उंबरे यांना रु.5.00 लाख व कै. मोहन रंगनाथ सलगर, रा उंबरे यांचे वारस पत्नी श्रीमती साधना मोहन सलगर, रा. उंबरे यांना रु.5.00 लाख व कै. गणेश बाबू रोकडे, रा.शेळके यांचे वारस पत्नी श्रीमती रेश्मा गणेश रोकडे, रा. शेळवे यांना रू.5.00 लाख असे एकूण रू.15.00 लाख सभासद अपघात विमा चे वाटप करण्याचे चे आमदार मा. श्री भारत भालके, यांच्या हस्ते देण्यात आले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक कै. पांडुरंग ऊर्फ राजू बापू पाटील व कै. बाळू लोंढे व इतर सभासद, कर्मचारी व हितचिंतक मयत झालेली आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक सर्वश्री श्री मोहन आन्ना कोळेकर, अॅड. दिनकरबापू पाटील, युवराज पाटील, विजयसिंह देशमुख, सूर्यकांत बागल, गोकुळ जाधव, तानाजी सावंत, संतोषकुमार गायकवाड, उत्तम नाईकनवरे, नारायण जाधव, बाळासाहेब गडदे, राजाराम भिंगारे, महादेव देठे, शांतिनाथ बागल, धनाजी घाडगे, माजी संचालक माणिक बाबर, जयसिंह देशमुख, तानाजी चव्हाण, मेजर विलास भोसले, द्रोणाचार्य हाके, राजाराम बाबर, दिपक सदाबसे, धोंडीबा वाघमारे, कांतीलाल भिंगरे, अॅड. कोष्टी आर. टी., बी.पी. पाटील, दामाजी कारखान्याचे चेअरमन रामचंद्र वाकडे, लतीप तांबोळी, सुरेश कट्टे, संदीप मांडवे, राहुल सावंजी, मुझमिल काझी, तुकाराम मस्के, शशिकांत शिरगिरे, संजय बंदपट्टे, शशांक गौरी, अतुल खरात, सुधीर भोसले, कारखान्याची सचिव श्री. बी.सी. कर्पे कारखान्याचे आजी माजी सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद, व्यापारी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारखान्याचे संचालक श्री दशरथ पंढरीनाथ खळगे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.