कै.सुधाकरपंत परिचारक यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

श्रीपूर ता.माळशिरस येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कै.सुधाकरपंत परिचारक यांची 85 वी जयंती श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीमध्ये रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिक सन्मान, परिसरातील सर्व डॉक्टरांना कोरोना योद्धा सन्मान, कोविड सेंटरचा उद्घाटन समारंभ व प्रथम निर्माण केलेल्या पाच साखर पोत्याचे पूजन अशा विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचा शुभारंभ डॉ.एम.के. इनामदार यांच्या शुभहस्ते कै.सुधाकरपंत परिचारक व विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आला. रक्तदान शिबिराचे उद्घाटन अकलूजचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.एम.के. इनामदार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तर प्रथम पाच साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक, माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, व्हाईस चेअरमन वसंतनाना देशमुख व उपस्थित संचालक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी कोरोना योद्धा सन्मान डॉ.एम के इनामदार, डॉ.अतुल फडे, डॉ.निनाद फडे, डॉ.सुनील बंडगर, डॉ.बाहुबली दोशी, डॉ.हरिश्चंद्र सावंत-पाटील, डॉ.उत्तम खरात, डॉ.विजय डहाळे, डॉ.जावेद मुल्ला, डॉ.सुनील फडे, डॉ.दादासाहेब पराडे-पाटील, डॉ.शिवाजी मुंडफणे, डॉ.संजय वाळेकर, डॉ.जितेंद्र गायकवाड, डॉ.आनंद पोखरे, डॉ. संजय लाटे, डॉ.भारत गायकवाड, डॉ.प्रमोद पवार, डॉ.सुधीर पोफळे या अकलूज, महाळुंग, श्रीपुर परिसरातील डॉक्टरांना कोरोना योद्धा सन्मान चिन्ह, विठ्ठलाची मूर्ती, सॅनिटायझर, शाल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी हॉस्पिटल मध्ये काम करणारे जगदीश अग्निहोत्री, श्रीकृष्ण पुजारी, सिकंदर डांगे, अजित पवार, प्रशांत सुमंत, हेमंत दिक्षित यांचाही सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांमध्ये तुकाराम कांबळे ,चंद्रकांत उंबरेकर, अनिल कुलकर्णी, अशोक पंडित,  प्रमोद मदाल या ज्येष्ठ नागरिकांना ब्लॅंकेट, शाल, श्रीफळ, पांडुरंगाची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पांडुरंग कारखाना व  श्रीयश मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोड मजुरांसाठी सुसज्ज असे २५  बेडच्या  कोविड सेंटरचे उद्घाटन चेअरमन प्रशांतराव परिचारक व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. यामध्ये पाच बेडला व्हेंटिलेटरची सोय आहे. यावेळी गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमचे संस्थापक राक्षे साहेब यांच्याकडे धान्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी केले, मनोगत बाळासो यलमार,अशोक पंडित, प्रकाश केसकर, डॉ. एम के इनामदार यांनी व्यक्त केले. 

या सर्व कार्यक्रमासाठी कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक, वाईस चेअरमन वसंतनाना देशमुख, माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, ज्येष्ठ संचालक अण्णा झांबरे, बाळासो यलमार,  भीमराव पाटील, शिवाजी साळुंखे, तानाजी वाघमोडे, रोहन परिचारक, अरुण घोलप, कारखान्याचे सर्व अधिकारी, कामगार, परिसरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिव्हिल इंजिनिअर एच. एस.नागणे  यांनी केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget