साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या नामफलकाचे उदघाटन समारंभ

 


साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारणेकामी सर्वोपतरी मदत करणार – आमदार प्रशांत परिचारक


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्या साठी जागा मिळावी म्हणून अनेक दिवसांपासून पुतळा समिती ने आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या कडे मागणी केली होती त्यास  अनुसरून  आमदार प्रशांतराव परिचारक यांनी जागा उपलब्ध करून देण्याबाबत नगराध्यक्षा व नगरसेवक यांना सूचित केले होते त्या नुसार  नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांनी एकमताने दि 1 ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये भक्ती मार्गावरील  जागा देण्याचा ठराव मंजुर केला. सदर जागेवर आज साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे पुतळा नियोजित पुतळा व स्मारक  नामफलकाचे उदघाटन  समारंभ  आमदार प्रशांतराव परिचारक  यांचे शुभहस्ते नगराध्यक्ष सौ. साधनाताई नागेश भोसले यांचे अध्यक्षतेखाली माजी उपनगराध्यक्ष मा. नागेश भोसले  उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर पक्षनेते गुरुदास अभ्यंकर , नगरसेवक कृष्णा वाघमारे बांधकाम समिती सभापती विक्रम शिरसट, आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, नगरसेवक संजय निंबाळकर, राजू सर्वगोड, सुप्रिया डांगे, अंबादास धोत्रे, , माजी नगरसेवक इब्राहिम बोहरी, रमेश कांबळे सामाजिक कार्यकर्ता  बसवेश्वर देवमारे, नवनाथ रानगट, नरेद्र डांगे  यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला तसेच  या वेळी साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे पुतळा समितीचे पदाधिकारी व समाज बांधव  नानासाहेब वाघमारे,  दिलीप देवकुळे, माजी नगरसेवक महेश साठे ,भगवान यादव ,नाईक रणदिवे,किशोर खिलारे,श्रीकांत कसबे,माजी नगरसेवक रमेश कांबळे या  पदाधिकारी  यांच्याकडे नगर परिषदेने केलेल्या ठरावाची प्रत या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते सुपूर्त करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक कृष्णा वाघमारे यांनी केले होते या वेळी बोलताना आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की , गेल्या अनेक वर्षापासुन साहित्यरत्न आणाभाऊ साठे यांचा पुतळा बसवावा अशी मागणी होती त्यानुसार आज नगरपरिषदेने साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे याच्या पुतळा व स्मारकांसाठी ४ गुंठे जागा देण्याचा निर्णय घेतला आहे लवकरातलवकर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या भव्यपुर्णाकृती पुतळा व स्मारक उभा करावे व यामध्ये कोणतेही राजकरण न करता स्मारकाचे काम लवकरातलवकर पुर्ण होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत या स्मारकासाठी लागणारी सर्वोतोपरी मदत निश्चितपणे केली जाईल असे आश्वासन दिले यावेळी नगराध्याक्षा साधनाताई भोसले उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव यांनी मनोगत व्यक्त केले तसेच या  कार्यक्रमांस  दिलीपरावजी देवकुळे,भगवान यादव,श्रीकांत कसबे, महेश साठे, धनंजय वाघमारे, पांडुरंग खिलारे,रमेश काबंळे, नारायण देवकुळे, राजु देवकुळे, विठ्ठल वाघमारे, पिंटु रणपिसे नितीन खिलारे रवि वाघमारे पंडित खिलारे प्रदिप यादव,  अमित अवघडे, विनोद वाघमारे,अजित खिलारे, प्रदिप रणदिवे, लखन रणदिवे अनिल मस्के किरण शेंडगे सुहास देवकुळे महावीर कांबळे दास अबुंरे अनिल यादव अभिजित कांबळे  व  बहुसंख्येने समाजबांधव उपस्थित होते.या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन व प्रस्ताविक नगरसेवक कृष्णा वाघमारे यांनी केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget