सोलापूर // प्रतिनिधी
गडचिरोली येथील कोपर्शी जंगलात नक्षलवाद्यांशी लढत असताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या पुळूज येथील पोलीस उपनिरीक्षक धनाजी व्हनमाने यांना आज पोलिस स्मृती दिनानिमित्त ग्रामपंचायत पुळूज येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आणि सोलापूर आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त वैशाली सातपुते यांच्या व शहीद धनाजी यांच्या आई व वडिलांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपल्या भाषणात शहीद व्हनमाने यांच्या नावाचा उल्लेख करत सर्व पोलिसांना श्रद्धांजली वाहिली. तसेच पुळुज येथे शहीद पोलिस उपनिरीक्षक धनाजी व्हनमाने यांचे स्मारक उभे करण्याचे योजीले आहे. या स्मारकासाठी जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती विजयराजजी डोंगरे यांनी पाच लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. शहीद पोलिस उपनिरीक्षक धनाजी व्हनमाने यांच्या आठवणी आज पुन्हा एकदा जाग्या झाल्या आणी सर्व उपस्थितांचे डोळे आज पुन्हा एकदा पाणावले. यावेळी शहीद धनाजी व्हनमाने यांचे बंधू विकास व्हनमाने पत्नी मयुरी, त्यांचे वडील तानाजी व्हनमाने, आई लक्ष्मीबाई, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विनोद महाडिक, रतिलाल गावडे, राजू बापू गावडे, सरपंच शिवाजी शेंडगे, मोहन खरात, मोहन गावडे, लक्ष्मण पांढरे, युवराज शिंदे, लिंगादेव निळगुंडे, पांडुरंग ताठे, शिवाजी लोमटे, प्रकाश खरात, सर्जेराव व्हनमाने, सलीम मुलाणी, राजाराम बाबर, किसन जाधव, राजू माने, महेश धनवे, समाधान लोमटे, मधुकर बाबर, तानाजी पांढरे,ग्रामसेवक आर पी कोळी, तलाठी गायकवाड, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते. पंढरपूर येथील पोलीस उपनिरीक्षक खरात साहेब यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून धनाजी व्हनमाने यांच्या आठवणी सांगत स्मारक लवकरात लवकर उभे करावे असे सुचवले. तसेच ग्रामपंचायत पुळुज व शाळा व्यवस्थापन समिती पुळुज येथे शहीद पोलिस उपनिरीक्षक धनाजी व्हनमाने यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल बांधकाम समिती सभापती विजयराजजी डोंगरे यांच्या अभिनंदन ठराव संमत करण्यात आला.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.