पंढरपूर // प्रतिनिधी
मागील महिन्यामध्ये पंढरपूर तालुक्याचे प्रांत अधिकारी सचिन ढोले यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर तालुक्यातील ज्या कारखान्याकडे थकित एफ.आर.पी आहे अशा कारखान्यांचे एम.डी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची एक मीटिंग झाली होती सदर मिटिंग मध्ये सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याकडे तेरा कोटी शेतकऱ्यांची थकीत बिले आहेत तसेच काळे परिवारातील दुसरा कारखाना सिताराम शुगर यांच्याकडे चोवीस कोटी रूपये शेतकऱ्यांची थकीत ऊसाची बिल येणे बाकी आहे
यादोन्ही कारखान्यांकडील तोडणी वाहतूक ठेकेदार व कामगारांचे पगार अशा विविध देण्याच्या बाबतीत चर्चा झाली होती कारखाना प्रशासनाने सदर मिटिंग मध्ये राज्य सहकारी बँकेचे कर्ज उपलब्ध होतात शेतकऱ्यांची कामगारांची तसेच सर्व देणे आम्ही तात्काळ देऊ असा शब्द दिला होता त्याचप्रमाणे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहकार शिरोमणी कारखान्याला राज्य सहकारी बँकेचे कमी लोन मिळाले आहे.
त्यामुळे आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे पहिल्यांदा शेतकऱ्यांची बिल द्यावीत मगच कारखाना सुरु करावा अशा आशयाचे निवेदन असहकार सुरू म्हणजे चेअरमन कल्याणराव काळे यांना कारखाना कार्यस्थळावर भेटून दिले यावेळी त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि पुढील आठवड्यात कसल्याही परिस्थितीत शेतकऱ्याची सर्व देणे देऊन आम्ही कारखाना सुरू करणार असे सांगितले
यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, रणजित बागल, मनोज गावंडे, श्रीनिवास नागणे, सचिन बागल,इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.