(श्री विठ्ठल कारखान्याचा बॉयलर साध्या पद्धतीने संपन्न)
सोलापूर // प्रतिनिधी
संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या तसेच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या व ज्या साखर कारखान्यावर संपूर्ण पंढरपूर तालुक्याचे अर्थकारण अवलंबून आहे अशा गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चाळीसावा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ कारखान्याचे संचालक श्री भगीरथ(दादा) भारत भालके व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ प्रणिता ताई भगीरथ (दादा) भालके यांच्या हस्ते ये आज अतिशय उत्साही वातावरणामध्ये व कोरोना चे सर्व नियम पाळून अत्यंत साधेपणानं पार पडला.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने येणाऱ्या अडचणी त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीमुळे कारखाना चालू करण्यासाठी खूप अडचणी येत असताना सुद्धा या सर्व अडचणीवर आ. भारत (नाना) भालके यांनी मात करून आपल्या पंढरपूर तालुक्यातील वेणु नगर गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा ४० बॉयलर प्रदीपन समारंभ आज संपन्न केला.
तसेच आज कारखान्याने आपली अखंड परंपरा जपत ह भ प किरण महाराज बोधले यांना अध्यक्षस्थानी विराजमान केले होते त्याचप्रमाणे पंढरपूर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन संजय आप्पा भिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी कारखान्याचे संचालक व आमदार पुत्र भगीरथ दादा भालके यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी कारखान्याकडे 23922एकर ऊसाची नोंद आहे. त्यातून आपण बारा ते साडेबारा लाख टन उसाचे गाळप करू शकतो.
जवळपास 334 ट्रॅक्टर, 68 डम्पिंग, 214 बैलगाडी 2 ऊसतोडणी( हार्वेस्टिंग) मशिन करार झाले असून त्याच बरोबर अधिक 2 ते 4 ऊसतोडणी ( हार्वेस्टिंग) मशिनचे करार लवकरच होणार आहे.
तसेच राहिलेल्या ४ ते ५ हजार एकर ऊसाची नोंद कारखान्याकडे आपल्या सर्व सभासद बांधवांनी करावी कोणीही कुठल्याही भुल थापांना बळी पडू नये त्याच प्रमाणे व्हाट्सअप फेसबुक वरच्या कोणत्याही मेसेजवरती विश्वास ठेवून कुणीही दिशाभूल करू नये. अजून चार ते पाच हजार एकर ऊस गाळपास आला तर; आपण १५ हजाराच्या आसपास गळीत हंगाम पार पाडु असा विश्वास सर्व विठ्ठल परिवारातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना यावेळी भगीरथ (दादा) भालके यांनी आपल्या भाषणातून दिला.
या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभासाठी कारखान्याचे व्हा चेअरमन मा. लक्ष्मण आबा पवार,समाधान काळे, मा. मोहन (आण्णा) कोळेकर,मा.राजाजरामादाजी भिंगारे, दिनकर (बापू) पाटील, दिलीपराव रणदिवे आदि मान्यवर व विठ्ठल परिवारातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.