(स्व. सुधाकरपंतमालकांची दराबाबतची परंपरा प्रशांत मालकांनी कायम ठेवली)
सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रमानांकित अशा श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा आज २९ वा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ अत्यंत उत्साही वातावरणात साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी स्व.कर्मयोगी शेतक-यांचे दैवत सुधाकरपंत परिचारक याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन आम प्रशांतराव परिचारक यांनी गेल्या वर्षी गळितास आलेल्या ऊसास 206 रुपये प्रमाणे अंतिम दर जाहीर केला आहे.यामुळे सर्व पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या सभासद वर्गातून एक प्रकारे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे(याबाबत आम्ही काही दिवसापूर्वी एक वृत्त प्रकाशित केले होते ते वृत्त अत्यंत तंतोतंत खरे ठरले आहे)
या 206 रुपये अंतिम हप्त्याच्या घोषणे नंतर स्वर्गीय कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक मालक यांची दराबाबत ची परंपरा आमदार प्रशांत मालकांनीसुद्धा कायम ठेवल्याचे सर्व सभासद वर्गातून बोलले जात आहे.
हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने व सर्व कोरोनाबाबतचे नियम पाळून संपन्न झाला.
या कार्यक्रमास कारखान्याचे चेअरमन आ. प्रशांतमालक परिचारक, व्हा. चेअरमन वसंतनाना देशमुख, माजी चेअरमन दिनकर मोरे, कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ. यशवंतराव कुलकर्णी. उपस्थित होते. युवा नेते खर्डीचे उपसरपंच प्रणव परिचारक, आजी-माजी संचालक, विविध बँकेचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थिती होते.
सत्यनारायण महापूजा कारखान्याचे विद्यमान संचालक श्री परमेश्वर गणगे व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते संपन्न झाली. कार्यक्रमासाठी माळशिरस पंढरपूर मंगळवेढा तालूक्यातील सर्व मालक प्रेमी व पांडुरंग परिवारातील सर्व नेते मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते, ऊस उत्पादक सभासद व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.