महाराष्ट्रातील नोकरभरती सन २०१९-२० मध्ये SEBC प्रवर्गातून निवड व कागदपत्रे पडताळणी झालेल्या उमेदवारांना मराठा आरक्षण स्थगिती नंतर पूर्वलक्षी (Retrospective) म्हणून नियुक्ती करावी:- संदिप मुटकुळे





पंढरपूर // प्रतिनिधी

मुख्यमंत्री महोदय एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांसाठी कोरोना काळामध्ये एक चांगला निर्णय घेतला त्याबद्दल आपल्या सरकारचे अभिनंदन तसाच एक निर्णय आपण२०१९-२०मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात घ्यावा.ही शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने आपणास नम्र विनंती.खालील संदर्भ १ ते १४ जाहिराती मधील उमेदवार हे निवड झालेलं असून नियुक्तीचे मागील ८ ते ९ महिन्यांपासून प्रतीक्षा करत आहेत त्यानंतर ९ सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली त्यामुळे SEBC कोट्यातून निवड झालेले सर्व उमेदवार हे व्यथित असून भविष्याची चिंता करत आहेत.तसेच आता मराठा आरक्षणाला आलेल्या स्थगिती मुळे पुढील निर्णय येई पर्यंत सदर नियुक्त्या थांबणार असल्याचे प्रशासनाचे संकेत आहेत.असे असताना राज्य सरकार चालू नोकरभरती बाबत काही सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा होती परंतु २३ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये संदर्भात विषयावर कोणताही निर्णय झालेला नाही म्हणून निवड झालेले सर्व पात्र उमेदवार अत्यंत चिंतेत आहेत.मराठा आरक्षण स्थगिती निर्णयामध्ये दिले आहे की SEBC साठी ९सप्टेंबर २०२०च्या पूर्वीचा लाभ अबाधित राहील व पूर्वलक्षी प्रक्रिया असताना देखील प्रशासन पात्र उमेदवारांना रुजू करून घेत नाही तरी यामध्ये आपण व आपल्या राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.तरी आपण वरील प्रकरणात लक्ष घालून राज्य सरकार व प्रशासनातील संबंधित अधिकारी यांच्याकडून सदर भरती प्रक्रियेबद्दल व ३२७उमेदवारांच्या नियुक्तीची चौकशी पुढील कार्यवाही करून न्याय मिळवून द्यावा.अशी नम्र विनंती.शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने आपणास करत आहोत अन्यथा आम्हास संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन आपल्या सरकारच्या विरोधात करावे लागेल असे शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी म्हटले.सरकारने याची नोंद घ्यावी.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget