सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूर ग्रामीण पोलीस दल कार्तिकवारी २०२० च्या अनुशंगाने सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने जनतेस आव्हान कोव्हिड -१ ९ च्या पार्श्वभुमीवर श्री क्षेत्र पंढरपुर जिल्हा सोलापूर येथे दिनांक २२/११/२०२० ते३०/११/२०२० दरम्यान मर्यादित स्वरूपात कार्तिकवारी संपन्न होत आहे . यावर्षी कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव असून पुणे शिक्षक व पदवीधर मतदार संघ , पुणे विभाग -२०२० या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू आहे . त्यामुळे महाराष्ट्र | शासनाने पीटीए १३२० / ४ ९ ३ / प्र.कं १६८ / का .१६ विधी न्याय विभाग मंत्रालय विभाग दिनांक २०/११/२०२० अन्वये शासन निर्णयाप्रमाणे कार्तिकवारी कालावधीत पंढरपुर शहरात बाहेरील राज्यातून तसेच महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्हयातून दिंडी येण्यास बंदी घातलेली आहे . त्याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व सर्व पोलीस प्रमुख यांना खबरदारी घेणेबाबत शासनकडून योग्य त्या सुचना देण्यात आलेल्या आहेत . भाविकांनी कोणत्याही प्रकारे पंढरपूर शहरामध्ये प्रवेश करू नये , याकरीता पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जा . कं.जिवाशा / कार्तिकवारी / वाहतुक नियमन / २०२० / ८ ९९ दिनांक २०/११/२०२० अन्वये जाहिरनामा तयार करण्यात आला आहे . त्यानुसार दिनांक २२/११/२०२० रोजी ००.०१ ते दिनांक ३०/११/२०२० रोजी २४.०० वाजेपर्यत जाहिरनाम्यातील नमुद पॉईंटवरून जडवाहतुक , दिंडी बंद करण्यात आली आहे . ( सोबत जाहिरनामा जोडण्यात आला आहे )
तसेच कार्तिकवारी कालावधीत कोणत्याही वाहनांना पंढरपूर शहरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही . पंरतु | नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपूर आगारात येणा – या बसेसला | प्रवेश देण्यात येईल . दिनांक २५/११/२०२० व २६/११/२०२० रोजी बसमध्ये प्रवाशी म्हणून कोणीही वारकरी येणार नाहीत . सदर काळात पंढरपूर शहरात काही नागरिकांना अत्यावश्यक कामासाठी येणे असल्यास त्यांनी शक्यतो नमुद कालावधीमध्ये पंढरपूर शहरात येण्याचे टाळावे . अत्यावश्यक काम असल्यास शक्य असेल तर ते २५/११/२०२० पुर्वी व दिनांक २६/११/२०२० नंतर करावे.परंतु सदर कालावधीमध्ये पंढरपूर शहरात उपस्थित असणा – या नागरिकांना सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून खालील सुचना देण्यात येत आहेत .
१ ) बसमधून प्रवास करून पंढरपूर शहरात आलेल्या नागरिकांनी विनाकारण एकत्र जमू नये .
२ ) विनाकारण शहरात संचार करू नये .
३ ) पंढरपूर शहरातील मंदीर परिसरात राहणारे नागरिकांनी कामाव्यतिरीक्त बाहेर पडू नये .
४ ) पंढरपूर शहरातील मंदिर परिसरात राहणा – या नागरिकांनी बाहेरच्या कोणालाही दरम्यान काळात घरी बोलावू नये.
५ ) पंढरपूर शहराबाहेरील लावण्यात आलेल्या नाकाबंदी मधून वाहने , पादचारी दिंडी यांना पंढरपूर शहरात प्रवेश करता येणार नाही.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.