वृत्तसंस्था // प्रतिनिधी
सध्या संपूर्ण बॉलिवूड ड्रग्स मुळे वादाच्या भोवर्यात अडकलेले असताना दिग्दर्शक योगेश पवार ने "द नशा डायरीज" नावाने वेब सिरीज दिग्दर्शित केलेली आहे वेब सिरीज मध्ये कॉलेजची तरूणाई ड्रग्स च्या जाळ्यात कशी अडकते, त्यातून बाहेर कशी पडू शकते किंवा ड्रग्स चे सेवन केल्यास तुमच्यावर काय बिकट परिस्थिती येऊ शकते या सगळ्याच गोष्टी अनुभवायला मिळतील. त्यासोबत मनोरंजनाचा एक तडका सुद्धा त्यांनी दिला आहे. द नशा डायरीज ची निर्मिती चंद्रभागा फिल्म प्रोडक्शन्स ने केली असून निर्माता म्हणून जीवन जाधव यांनी एक उत्तम विषय निवडला आहे. या वेब सिरीज मध्ये योगेश पवार, शिवराज वाळवेकर, हर्ष अय्यर, शाष्वती खन्ना वैभव पगारे, भाग्यश्री बडकस आणि प्रशांत सिंग यांनी प्रमुख भूमिका उत्तम रित्या साकारल्या आहेत.
संपादक स्टार टिव्ही ९ महाराष्ट्र राज्य व पत्रकार दैनिक मराठवाडा केसरी पत्रकार व पत्रकार हिंदु सम्राट उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ सुनिल ज्ञानदेव भोसले यांनी वेळोवेळी माहिती देत राहिले. लॉकडाउन कलावधीत खुप मदत व विशेष मार्गदर्शन दिले लॉकडाऊन कालवधीत नियम पाळुन काम करवे अशी माहिती
निर्माते जीवन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार "द नशा डायरीज" ही वेब सिरीज लवकरच आपल्याला "पिंग पोंग" ॲप वर बघायला मिळेल. योगेश पवार च्या म्हणण्यानुसार नुसतीच एक मनोरंजन कथा करण्यापेक्षा जर त्यामधून आपण सामाजिक संदेश देऊ शकलो तर आपली आपल्या देशा साठी एक छोटी मोलांची भागीदारी असू शकते त्यामुळे ड्रग ॲडिक्शन हा विषय त्यांनी निवडला. आपले मनापासून आभार.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.