पंढरपूर प्रतिनिधी:-कोविड १९ च्या प्राश्वभूमीवर पंढरपूर येथे २२ ते ३० नोव्हेंबर दरम्यान मर्यादिक स्वरूपात वारी संपन्न होत आहे.कोविड प्राश्वभूमी तसेच आचार सहिता लागू असल्यामुळे पंढरपूर शहरात इतर राज्यातून तसेच महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यातून येणाऱ्या दिंड्यांना बंदी घातलेली आहे. कार्तिकीवारी यात्रा कालावधीमध्ये कोणत्याही वाहनाना पंढरपूर शहरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही,परंतु नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या पंढरपूर आगारामध्ये येणाऱ्या एसटी बसेसला परवानगी देण्यात येईल. 25/11/2020 ते 26/11/2020 या कालावधीत प्रवासी म्हणून कोणीही वारकरी येणार नाही.सदर काळात काही नागरिकांना पंढरपूर शहरात काही अत्यावश्यक कामानिमित्त येणे असल्यास त्यांनी शक्यतो येणे टाळावे.अत्यावश्यक काम असल्यास शक्यतो ते यात्रा कालावधी नंतर करावे.तसेच बस मधून प्रवास करून आलेल्या नागरिकांनी विनाकरण एकत्र जमू नये.मंदिर परिसर भागातील नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर पडू नये.तसेच पंढरपूर शहराबाहेर लावण्यात आलेल्या नाकाबंदीतून वाहने, पादचारी दिंडी यांंना प्रवेश मिळाणार नाही.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.