आयबीपीएसमध्ये मेगा भरतीची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल 600 हून अधिक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा बाळगणा-यांसाठी नक्कीच ही मोठी संधी मानली जात आहे. इच्छुक उमेदवारांनी आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ibps.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी अंतिम तारीख 23 नोव्हेंबर 2020 आहे.
आयबीपीएस म्हणजे इन्स्ट्यूट ऑफ बँकिंग अॅण्ड पर्सनल सेलेक्शनने 647 रिक्त जागांवर भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अॅग्रीकल्चरल फील्ड ऑफिसरच्या 485 पदं, मार्केटिंग ऑफिसरच्या 50 जागा, राजभाषा अधिकारीच्या 20 जागा आणि एचआर/ पर्सनल ऑफिसरच्या 7 जागांचा समावेश आहे.
यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही 23 नोव्हेंबर 2020 ठेवण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता
आयबीपीएसच्या अॅग्रीकल्चरल फील्ड ऑफिसरच्या 485 पदासांठी अर्ज दाखल करण्याकरिता मान्यता प्राप्त विद्यापीठ व संस्थातून अॅग्रीकल्चरल अभियंतामध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे.
मार्केटींग ऑफिसर
या पदांवर अर्ज दाखल करण्याकरिता कुठल्याही क्षेत्रातील मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर होणे आवश्यक आहे. यासोबतच दोन वर्ष एमबीए मार्केटींग पदवीधर पाहिजे.
लॉ ऑफिसर
या पदांवर अर्ज दाखल करण्यासाठी मान्यता प्राप्त महाविद्यालयातून लॉमध्ये बॅचलर डिग्री, एलएलबी सर्टिफिकेट, यासोबतच बार काऊंसिलमध्ये अॅडवोकेट म्हणून एनरोल होणे आवश्यक आहे.
राज्यभाषा अधिकारी
या पदांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारानं मान्यता प्राप्त महाविद्यालयातून हिंदी आणि इंग्लिश भाषांमध्ये पोस्ट गॅज्युअट उत्तीर्ण आवश्यक आहे. किंवा संस्कूतमध्ये पोस्ट गॅज्युअटसोबतच हिंदी, इंग्लिशमध्ये पद्वीधर होणे आवश्यक आहे.
एचआर पर्सनल ऑफिसर
या पदासाठी उमेदवाराचं मान्यता प्राप्त महाविद्यालयातून कुठल्याही क्षेत्रातील पद्वीधर असल्यासोबतच दोन वर्षाचं एमबीए पद्वीधर उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच मान्यता प्राप्त महाविद्यालयातून पर्सनल मॅनेजमेंट/ इंडस्ट्रियल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा उत्तीर्ण पाहिजे.
आयबीपीएसच्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दोन नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2020 या दरम्यान उमेदवार अर्ज दाखल करु शकतात. तसेच परिक्षा दोन टप्प्यात होणार आहे. ऑनलाईन परिक्षेसाठी कॉल लेटर डिसेंबर महिन्यात डाऊनलोड करता येऊ शकेल. आयबीपीएसच्या निर्देशानुसार ऑनलाईन परिक्षा 26 आणि 27 डिसेंबरमध्ये आयोजित केली आहे. तर जानेवारी 2021 पर्यंत निकाल देणार असल्याची शक्यता आहे. आयबीपीएसद्वारे आयोजित ऑनलाईन परिक्षेनंतर मेन्स परिक्षा 24 जानेवारी 2021 ला आयोजित केली जाऊ शकते.
असे करा अर्ज
आयबीपीएसच्या रिक्त पदांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारानं 2 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबरदरम्यान आयबीपीएसच्या www.ibps.in व sarkariresult.com या संकेतस्थळावर अर्ज दाखल करु शकतात. अर्ज दाखल करण्यासाठी 1000 रुपये शुल्क लागणार आहे. एससी-एसटी आणि ईडबल्यूएसमध्ये येणा-या उमेदवारांना 175 रुपये शुल्क लागणार आहे. डेबिट कार्ड, क्रेटिट कार्ड, नेट बँकिंग आणि इ-चलानद्वारे शुल्क भरु शकतात. उमेदवारांना अर्ज दाखल करण्याकरिता पासपोर्ट फोटो, सिग्नेचर स्कॅन अपलोड करावे लागणार आहे. यासोबतच महत्वाचे दस्ताऐवज स्कॅन करुन अपलोड करावे लागतील. तसेच अर्जसंबंधित अधिक माहितीसाठी आयबीपीएसच्या ऑफिशिअल वेबसाईट www.ibps.in या संकेतस्थळावर भेट द्या.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.