बुधवारी महिला बचत गटांच्या कर्जमाफीसाठी मनसेचा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

 


(महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन)


सोलापूर प्रतीनीधी:-  जिल्ह्यातील महिला बचत गटातील महिलांना मायक्रो फायनान्स चे कर्ज माफ करावे व राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे वीज बिल माफ करावे या मागणीसाठी मनसेच्या वतीने बुधवार २५ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप (बापु)धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


मायक्रो फायनान्स कंपनी सभासद असलेल्या महिलांकडून दिलेल्या कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी सुरक्षा म्हणून दरवर्षी विमा पॉलिसी च्या नावाखाली हजारो रुपये घेतात. परंतु विम्याचे सर्टिफिकेट देत नाहीत. कोरोना महामारीच्या काळात अनेक उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. कोणाच्याही हाताला काम नाही. उपासमारीची वेळ आली आहे एवढेच नव्हे तर भूकबळी जात आहेत. अनेक सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीमुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. महाराष्ट्रातील लाखो महिलांनी कर्ज घेतले आहेत पण व्यवसाय बंद असल्यामुळे ते कर्ज भरू शकत नाहीत. अनेक महिलांनी कर्ज देऊन लोणचे पापड शेवया यासारखे पदार्थ तयार केले होते परंतु लॉकडाऊन मुळे हा माल विकला गेला नाही. सहा महिन्यात तो माल पूर्णपणे खराब झाला, त्यामुळे भांडवल सुद्धा बुडाले आहे. महिलावर्ग पूर्ण संकटात सापडला असून मायक्रो फायनान्स चे कर्मचारी सभासद महिलांच्या घरी जाऊन वसुलीसाठी तगादा लावतात, धमकी देतात. त्याच सोबत पैसे द्या अन्यथा तुमचा टीव्ही, फ्रीज, गॅस, भांडी तसेच संसारोपयोगी वस्तू घेऊन जातो अशा धमकी देतात. अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये मनसेच्या वतीने देण्यात आली.

बुधवारी निघणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे करणार आहेत. या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकार, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनोद्दीन शेख, विद्यार्थी सेनेचे अमर कुलकर्णी आदी उपस्थित होते.


कोरोनाच्या संकटामुळे सर्व उद्योग, व्यवसाय बंद पडले आहेत. कोणाच्याही हाताला काम नाही, उपासमारीची वेळ आली आहे. अनेक लोक आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या करत आहेत. राज्यातील लाखो महिलांनी कर्ज घेतले आहे पण व्यवसाय बंद पडल्यामुळे ते कर्ज भरू शकत नाहीत, तरी शासनाने महिला बचत गटातील महिलांचे मायक्रो फायनान्स चे कर्ज माफ करावे व लॉकडाउन काळातील विज बिल माफ करावे या मागणीसाठी बुधवारी मोर्चा निघणार असल्याची माहिती दिलीप (बापु) धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget