सोलापूर प्रतिनिधी : लॉकडाऊन काळातील नागरिकांना आलेल्या वाढीव वीज बिलाच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या दुटप्पी धोरणाचा निषेधार्थ भाजपातर्फे 23 नोव्हेंबर रोजी कुरुल रोड वरील एम. एस. ई. बी. कार्यालया समोर वीजबिलांची होळी करून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मोहोळ तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण यांनी दिली.
लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले आली. लॉकडाऊन मुळे आर्थिक तणावाखाली असलेल्या जनतेला सरकारने मोठ्या वीज बिलाचा शॉक दिला. याबाबत जनआक्रोश निर्माण झाल्यानंतर सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या ऊर्जामंत्री यांनीच वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावी लागतील, असे स्वतः स्पष्ट सांगण्यात आले.
दुसरीकडे महावितरण सक्तीने वीज बिले वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करून जनतेला सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून आपण रस्त्यावर उतरणे जनहितासाठी गरजेचे आहे.
महाविकास आघाडी सरकारने भरमसाठ वीज बिलाबाबत जनतेला रास्त सवलत द्यावी. या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी मोहोळ तालुका यांच्या वतीने सोमवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता वीज बिलाच्या होळी आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.