भविष्यातील मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी आज आराक्षण खूप महत्त्वपूर्ण असून त्यासाठी मराठा समाज हा न्यायाच्या प्रतीक्षेत÷संदिप मुटकुळे



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

आजपर्यंत दिले गेले आरक्षण इतर जातींना का देण्यात आले ? व कशाच्या आधारावर देण्यात आले ? त्याचे निकष काय होते ? त्यासाठी कुठला आयोग स्थापन करण्यात आला होता का ? सदर आयोग हा संविधानिक होता का ? आरक्षणाची मर्यादा ५०% असताना ती ५२% कशी करण्यात आली ? त्यासाठी संविधानात तरतूद होती का ? या सारखे प्रश्न मराठा समाजाने आज पर्यंत कधीही ईतर समाजाला विचारले नाही किंवा त्याविरोधात कधी कोर्टात धाव घेतली नाही. इतरांच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का लागू दिला नाही किंवा त्यावर कुठलीही आच आणली नाही, मग आज मराठा समाजाची अवस्था ही दैनिय असताना तसेच संपूर्ण संविधानिक मार्गाने मराठा समाज आरक्षणाची मागणी करत असताना त्यास कृपया कोणीही विरोध करु नये,

मराठा समाजाने कधीही कुणाला विरोध केला नाही त्यामुळे मराठा समाजाला कुणीही विरोध करण्याचे कारण नाही.आम्ही कुणाच्या हक्काचे मागत नाही तर आमच्या हक्काचे कुणाला देणार पण नाही आणि जे हक्काचे आहे ते घेतल्याशिवाय शांत देखील बसणार नाही.भारतीय राज्य घटनेत सर्वांना अधिकार दिले आहेत त्यामुळे कुणाच्या तरी सांगण्यावरून मराठा आरक्षणाला विरोध करुन जातीय तणाव निर्माण करु नये.असे आव्हान शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी केली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget