(ग्रामीण भागात जपली अतुल चव्हाण यांनीअनोखी सामाजिक बांधिलकी)
पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील सप्तशृंगी परिवाराच्या वतीने जवळपास 300 कुटुंबांना सप्तशृंगी परिवाराचे हनुमंत अप्पा चव्हाण यांच्या हस्ते साखर वाटप करण्यात आली.
त्यातच कोरला सारख्या महाभयानक रोग आणि अख्या जगात हाहाकार माजवलेला असताना सतत च लॉकडाऊन असल्या मुळे अनेकांच्या हाताला काम धंदा नसल्यामुळे कायम अडचण येत असल्याने तालुक्यातील सुस्ते हे गाव भीमा नदीच्या काठाला आहे परवा आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबाच्या घरांमध्ये पाणी शिरले होते आणि त्याच वेळी काही दिवसात दीपावली हा सण आला असता भीमा नदीला आलेला अक्राळविक्राळ महापूर व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांची झालेली कोंडी या संकटामुळे शेतकरी कोलमडून गेला आहे.
भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांचे फळबागा सह टोमॅटो, केळी व ऊसासह अनेक विकास हित जमीन सुद्धा वाहून गेलेली आपण पाहिले आहे. अशातच शेतकरी व गोरगरिबांची दीपावली गोड व्हावी म्हणून सुस्ते येथील युवा नेते अतुल चव्हाण यांच्या सप्तशृंगी परिवाराच्यावतीने जवळपास 300 कुटुंबांना साखर वाटप केली आहे.
यावेळी श्रीमंत चव्हाण, जगदंबा ग्रुप चे हनुमंत तात्या चव्हाण, धनंजय घाडगे, अनंता चव्हाण, अर्जुन चव्हाण, मुकुंद चव्हाण, वैभव शिरसठ, तानाजी रणदिवे, चंद्रकांत माने, अंबादास वायदंडे, भैय्या फडतरे, संग्राम पवार, समीर शेख, युवराज चव्हाण, संग्राम चव्हाण, दादा मोरे, सोहम अडसूळ आदीजण उपस्थित होते.
गोरगरीब वंचित घटकांना मदत करण्यासाठी सदैव सप्तशृंगी परिवार अग्रेसर असतो त्याचप्रमाणे सुस्ते येथील तीनशे कुटुंबांना आम्ही साखर वाटप केले असून गोरगरिबांच्या सदैव अडीअडचणी सोडवण्यासाठी सुद्धा सप्तशृंगी परिवार सदैव त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे यावेळी सप्तशृंगी परिवाराचे प्रमुख व सप्तशृंगी पतसंस्थेचे चेअरमन अतुल चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
:- चेअरमन अतुल चव्हाण सप्तशृंगी परिवार सुस्ते


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.