पंढरपूर // प्रतिनिधी
सन २०१९ मध्ये उपकेंद्र सहाय्यक या पदाची भरती निघाली होती सदरची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली असुन ९ सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली गेल्याचे कारण सांगत या उमेदवारांच्या नियुक्या अडवुन ठेवल्या आहेत.मा.न्यायालय सुप्रिम कोटनि ९ सप्टेंबर पुर्वी झालेल्या नियुक्त्या कायम करण्याचे आदेश दिले असतांना SEBC प्रवर्गातुन निवड झालेल्या विद्यार्थ्यानां नियुक्त्या न देता अडवण्याचा काही अधिकाऱ्यांचा डाव असुन यामुळे मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असे दिसते तरी याबाबत राज्यशासन व सरकार यांनी यावर तात्काळ निर्णय घेणे आवश्यक आहे.आणि त्याच्यातच दिनांक १४/११/२०२० रोजी उर्जामंत्री यांनी प्रसार माध्यमांसमोर सर्वाना नियुक्ती देण्याचे आदेश दिले व असे स्पष्ट केले की , एकही मराठा उमेदवार विना नियुक्तीचा राहणार नाही व दुसरीकडे महावितरणचे परिपत्रक प्रसारित झाले की , SEBC ला वगळुन नियुक्ती आदेश देण्यात येतील म्हणजे मंत्री एक बोलतात आणि अधिकारी वेगळे परिपत्रक काढतात यांच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असुन आपणाला अशी विनंती आहे की , मराठा समाजातील विद्यार्थ्यांना डावलून राज्य सरकारने ह्या नियुक्त्या जर केल्या तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाज व सरकारमध्ये संघर्ष निर्माण हा निश्चितपणे होईल आणि यास सर्वस्वी जबाबदार आपले सरकार व प्रशासकीय अधिकारी असतील.
कारण आता आमचा संयमाचा बांध संपलेला आहे राज्य सरकारला राज्यात शांतता हवी नसेल तर राज्य सरकारने ही भरती करून दाखवावी, सरकारलाही मराठा समाज काय आहे हे आम्ही दाखवून देऊ.प्रत्येक वेळी मराठा समाजावर अन्याय करायचा आणि मराठा समाजाने तो शांततेत सहन करायचा हे यापुढे चालणार नाही जोपर्यंत आमच्या मुलांच्या नियुक्ती संदर्भात ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या नियुक्तीचे आदेश आपल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी देऊ नये ही आपणाकडे विनंती करतो व आपण तातडीने यांच्यातुन मार्ग काढुन योग्य तो न्याय मुलांना मिळवुन द्यावा. अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मेलव्दारे केली आहे..

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.