पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील सुप्रसिद्ध नामांकित असलेले उद्योजक मा. राहुल (दादा) महाडिक यांची महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली असून त्याबद्दल पंढरपूर येथील लिंबू बागायतदार संघाचे अध्यक्ष मा. विनोद (भैय्या) महाडिक यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला
सामाजिक बांधिलकी व सामाजिक कार्य पाहूनच भारतीय जनता पक्षाने भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करून माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे व या संधीचे सोने करून गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राहुल(दादा) महाडिक यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. खासदार धनंजय महाडिक, मा. आ.अमल महाडिक,मा.सम्राट (बाबा) महाडिक, आदी सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.