एकनाथ खडसे बालंबाल बचावले, धावत्या वाहनाचं फुटलं टायर




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

भाजपला रामराम ठोकून नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे रविवारी थोडक्यात बचावले. खडसे यांच्या धावत्या वाहनाचं टायर फुटलं. वाहनचालकानं प्रसंगावधान राखून वाहनावर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. वाहनाचा अपघात होता होता वाचला आणि एकनाथ खडसे थोडक्यात बचावले.    धरणगाव-जळगाव महामार्गावर हॉटेल अमोल समोर रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.मिळालेली माहिती अशी की, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अमळनेर येथील कार्यक्रम आटोपून एकनाथ खडसे आपल्या वाहनाने जळगावकडे परत येत होते. धरणगाव- जळगाव महामार्गावर हॉटेल अमोल समोर त्यांचं वाहन येताच वाहनाचे टायर फुटलं. वाहन चालकानं प्रसंगावधान राखून क्षणात वाहनावर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घडली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget