उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखाना युनिट३च्या प्रथम पाच साखर पोती पुजन हमाल कामगारांच्या हस्ते करण्यात आले आहे.
चेअरमन पाटील पुढे बोलताना म्हणाले की,ज्या हमालाच्या पाठीवरती ओझं दिलं जातं, त्यांना हा मान देण्यात आला असून लहानातल्या लहान गोष्टीपासून मिळणारा आनंद वेगळाच असतो. कारखानामध्ये काम करणारा प्रत्येकजण माझ्या कुटुंबातील एक घटक आहे.
यंदा यावर्षी कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस आहे. व या भागातील शेतकऱ्यांचा ऊस आणल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. यंदा गळीत हंगाम मोठा असून जास्तीत जास्त गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. पुढच्या वर्षीही ऊसाचे प्रमाण आणखीच वाढणार आहे. त्यामुळे आपल्या नोंदी कारखान्यास देऊन सहकार्य करावे. कारखाना शेतकऱ्यांनच्या हक्काचा आहे. नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल अशी ग्वाही चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली.
यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, भागातील सरपंच, उपसरपंच व सर्व अधिकारी, कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.