पंढरपूर // प्रतिनिधी
दि.७\११\२०२०रोजी दुपारी १२वाजता श्रीक्षेत्र पंढरपूर येथील पांडूरंगचे दर्शन घेवून संत नामदेव पायरीपासून मंत्रालय मुंबई येथे मराठा आरक्षणाच्या या हक्कासाठी निघणार आहे.तरी गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणसह आपल्या न्याय हक्काच्या मागण्या लोकशाहीच्या मार्गाने शांततेने व मोर्चे व आंदोलने केले आहेत.तरीही राज्य सरकार व केंद्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही.आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी मागण्या करूनही हे दोन्हीही सरकार सतत टाळाटाळा व दुर्लक्ष करीत आहे. आज वास्तविक मराठा विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे.गेल्या अनेक वर्षापासून नोकर भरतीतील मराठा आरक्षणाच्या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्याही दिल्या नाहीत.तर सध्या सुप्रिम कोर्टात मराठा आरक्षणाला स्थितीती दिली आहे.ती स्थितीती उठविण्यासाठी प्रत्यन केले नाही.यापुढे आमच्या न्याय हक्काच्या मागण्या बाबत केंद्र सरकारने व राज्य सरकारने सामाजिक हितासाठी मराठा समाज विद्यार्थ्यांना ठोकपणे निर्णय घेवून न्याय देण्यात यावे.जर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने योग्य निर्णय नाही घेतलातर सकल मराठा समाज शांत बसणार नाही.या राज्य व केंद्र सरकाराला जागे करण्यासाठी सकल मराठा समाज पंढरपूर ते मुंबई मंत्राल्यावर आक्रोश पायी दिंडी मोर्चा धडकणार आहे.जो पर्यंत सरकार आमच्या हक्काचे आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई मंत्रालय सोडणार नाही.मराठा आरक्षणासाठी आम्ही पंढरपूर ते मुंबई मंत्राल्यावर पायी दिंडी मोर्चा आयोजित करण्यात आले आहे.मराठा क्रांती ठोक मोर्चाचे महाराष्ट्र राज्य समन्वय महेश डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.तरी महाराष्ट्रातील सकल मराठा समाज बांधवांनी आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी पायी दिंडी मोर्चामध्ये सामील व्हा असे आव्हान सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक संदिप मुटकुळे यांनी केले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.