वृत्तसंस्था // प्रतिनिधी
पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi ) योजनेचा ७ वा हफ्ता १ डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात जमा होणार आहे. तुम्ही देखील शेतकरी आहात आणि या हफ्त्याची वाट पाहत असाल तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये देते. आतापर्यंत शेतकऱ्यांना ६ हफ्ते दिले गेले आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा पहीला हफ्ता डिसेंबर २०१८ मध्ये दिला गेला होता. यावेळी ३.१५ कोटी ९९ हजार ६२९ शेतकऱ्यांना निधी देण्यात आला. ७ वा हफ्ता १ डिसेंबरला दिला जाईल. गेल्या २३ महिन्यामध्ये केंद्र सरकारने ११.१७ कोटी शेतकऱ्यांना थेट ९५ कोटी रुपयांहून अधिक मदत मिळाली आहे. तुमचे नाव या यादीत नसेल तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. कित्येक वेळा रजिस्ट्रेशन करुनही सरकारी मदत येत नाही. त्यामुळे तुमचे नाव या यादीत आहे ता आहे आजच तपासून पाहा. जर यादीत नाव नसेल तर हफ्ता मिळणार नाही हे लक्षात असू द्या. मागचा हफ्त्यातील पैसे मिळाले नसलेल्यांना चुका सुधारण्याची संधी आहे. यासाठी पंतप्रधान शेतकरी योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल. शेतकरी घरबसल्या अर्ज करुन पेपर्स ऑनलाईन अपलोड करु शकतात. ही प्रक्रीया खूप सोपी आणि कमी वेळेत पूर्ण होणारी आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.