वृत्तसंस्था // प्रतिनिधी
महाराष्ट्र पदविधर संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी महादेव मुजमुले यांची निवड झाली. याशिवाय नेहमीच ते नाळ फाऊंडेशन व महाराष्ट्र पदविधर संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी महादेव मुजमुले-देशमुख यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तसेच भोसे गावचे उपसरपंच ऍड. गणेश दादा पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. त्या वेळेस त्या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मा. शहाजी मुळे, जिल्हा परिषद सदस्य मा.अतुल खरात,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष मा. अमर इंगळे, राष्ट्रवादी युवक कांग्रेस पंढरपूर तालुका उपाध्यक्ष मा. दिपक ढोबळे, मा. राहुल मुजमुले, विठ्ठल कोरके, निखिल खुळपे आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्कार प्रसंगी महादेव मुजमुले यांना मान्यवरांकडून भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.