गोव्यात भाजपला बसणार हादरा, शरद पवारांची लवकरच मोठी खेळी?



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने (NCP) एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. आता याच धर्तीवर गोव्यातही (goa political crisis) राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप (BJP) विरोधी मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा गोव्यातल्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कुटुंबासह खाजगी दौऱ्यावर गोव्यात आहेत. त्यांच्या सोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत. यादरम्यान, त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत काँग्रेसचे नेते अश्विन खलप यांच्या भेटी घेऊन रात्री उशीरा दीर्घ चर्चा केली.या भेटीचे फोटो खासदार सुळे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. या चर्चेचा कोणता तपशील बाहेर आला नसला तरी शरद पवार हे महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यातही भाजप विरोधातील मोठ बांधू शकतात, असं बोलले जात आहे.सध्या गोवा विधानसभेत भाजपची सत्ता असून एका अपक्षाचा पाठिंबा आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 13 जागा  जिंकून सुद्धा भाजपनं गोवा फॉरवर्ड पक्ष 3, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष 3, आणि 3 अपक्षांच्या सहाय्याने सरकार बनवलं होतं.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget