मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमास सुरवात

 



मतदार यादीतील नाव, पत्ता दुरुस्ती करण्याची संधी मिळणार


सोलापूर // प्रतिनिधी 

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघांच्या मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 17 नोव्हेंबर 2020 पासून सुरू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. यामुळे मतदार यादीतील नाव, पत्ता आदी दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे. 


            एक जानेवारी 2021 अर्हता दिनांकावर आधारित प्रारुप मतदार याद्या मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रारुप मतदार याद्यांमध्ये नावे नसलेले मतदार नाव नोंदणीसाठी विहित नमुन्यात अर्ज करु शकतील. याद्यांतील नावांबाबत आक्षेप असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती, सुधारणा करावयाच्या असल्यासही दावे आणि हरकती  15 डिसेंबर 2020 पर्यंत प्रत्येक विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) यांच्या कार्यालयात स्वीकारल्या जाणार आहेत, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.


            दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत  05 जानेवारी 2021 पर्यंत आहे. डाटाबेसचे अद्ययावतीकरण आणि पुरवणी याद्यांची  छपाई 14 जानेवारी 2021 पर्यंत करुन  15 जानेवारी 2021 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान दोन शनिवार आणि दोन रविवारी प्रत्यक्ष मतदान केंद्रांच्या ठिकाणी विशेष मोहिमेचे (स्पेशल कॅम्पेन) आयोजनही करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.


            पूर्वीच्या मतदार यादीतील मरण पावलेल्या, स्थलांतरीत झालेल्या किंवा दुबार नोंदणी झालेल्या मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. अशा वगळण्यात आलेल्या नावांची यादी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात ठेवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.


            सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्राकरीता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याची (बूथ लेव्हल एजन्ट- बीएलए) नेमणूक करावी आणि शासनाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बूथ लेव्हल ऑफीसर- बीएलओ) यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे. ऑनलाईन अर्ज नोंदणीची सुविधा http://www.nvsp.in या वेबपोर्टलवरही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget