वृत्तसंस्था // प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील सर्व कारखानदार एकत्र येऊन शेतकऱ्यांना लुटत असून सतराशे रुपये ऊस दर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करत आहेत, म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना एकत्रित येऊन बळीराजा, रयत क्रांती, प्रहार, स्वाभिमानी या शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत सोलापूर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी यांनी कारखानदार व शेतकरी प्रतिनिधींची बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढावा व २५००/- रुपये पहिला हप्ता शेतक-यांच्या जमा करावा नाही जमा केल्यास तर सर्व साखर कारखान्यांच्या समोर दि. २६/११/२०२० रोजी सकाळी ११ वाजल्यापासून बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी जिल्ह्यातील शेतकरी चळवळीतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. बळीराजाचे माऊली हळणवर, रयत क्रांतीचे दीपक भोसले, प्रहार संघटनेचे दत्तात्रय मस्के, स्वाभिमानी संघटनेचे विजय रणदिवे, मोहम्मद पटेल, बळीराजाचे ज्ञानेश्वर जवळेकर, सोमनाथ भोसले आदीसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.