पंढरपूर प्रतिनिधी :- कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या कलाकारांची दिवाळी गोड व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस मा.दिलीप (बापु) धोत्रे यांनी स्थानिक गोरगरीब व गरजू कलाकारांनी साखर,शेंगदाणे, रवा,तेल,दाळ,साबण,उणे आदींसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.
मागील आठ महिन्यापासून लाॅकडाऊन सुरू असून या काळात स्थानिक कलाकारांची मोठी कुचंबणा झाली.आर्थिक अडचणीत असलेल्या या कलाकारांची दिवाळी गोड व्हावी यासाठी येथील शंभर ते दोनशे गरजू व गरीब कलाकारांना अनोखी भेट देऊन दिवाळी गोड केली.
ऐन दिवाळी सणावेळी मदत मिळाल्याने मनसेचे नेते दिलीप (बापू) धोत्रे यांचे सर्व कलाकारांनी मनापासून आभार ही मानले.



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.