जयहिंद शुगरच्या गाळप कारखान्याच्या गाळप हंगामास‌ सुरूवात.




(कारखान्याचा गाळप हंगाम संपूर्णपणे यशस्वी होणार:- खा. जयसिद्धेश्वर महास्वामी)


सोलापूर // प्रतिनिधी 

सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जय हिंद कारखान्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा. कारण यांच्याकडून आपली कोणतीही गैरसोय होणार नाही, ह्याची ग्वाही मी देतो. तसेच जय हिंद शुगरचे उद्दिष्ट निश्चित पूर्ण होईल असे प्रतिपादन खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी आज आचेगाव येथील जय हिंद शुगर या साखर कारखान्याच्या 6 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी खासदार महास्वामी यांच्या व चुंगीचे शेतकरी संतोष पाटील व त्यांच्या पत्नी शैलजाताई पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उसाची मोळी गव्हाणी टाकून हंगामास प्रारंभ करण्यात आला.


यावेळी कॉसमॉस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे, जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासक शैलेश कोथमिरे, बोधले महाराज धामणगाव, सचिन गुंड, प्रा. माउली जाधव, न्यू हॉलंड कंपनीचे संचालक किरण रामसिंग, जयहिंद शुगर अध्यक्ष गणेश माने देशमुख, कार्यकरी निर्दशक बब्रुवाहन माने देशमुख, उपाध्यक्ष विक्रम सिंह पाटील, सोमनाथ माने, अचेगाव सरपंच रमेश शिरसागर, मुख्य शेती अधिकारी चंद्रशेखर जेऊर, कार्यकारी संचालक मोहन पिसे, मुख्य हिशोबनिस श्री. पवार, चीफ केन मॅनेजर अमोल जगताप, ज्ञानेश्वर बळवंतराव, युवराज आरेकर, व्यंकट मोरे, अभिनंदन गांधी, लाला राठोड, अरविंद शिंदे आदी उपस्थित होते.


माउली जाधव यांनी कारखाने प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.

फर्स्ट विकता गणेश माने देशमुख म्हणाले की या वेळेचा हंगामा सर्वात मोठा आहे. तसेच यावेळी आवाहन देखील तेवढेच जास्त असणार आहे. सर्व शेतकऱ्यांचा ऊस गाळप करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येणार आहे. कारखाना सचोटीने चालवून सर्वांनी कारखान्यात ठेवलेला विश्वास सार्थ ठरवू. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष काळे म्हणाली की मी शेतकरी कुटुंबातील असून शेतकऱ्यांची दिवाळी कशी असते व त्यातून आनंद कसा प्राप्त केला जातो.

तू बघण्याचा आनंद मला आजचा कार्यक्रमाने झाला आहे. शैलेश कोथमिरे मनाली की अडचणीच्या स्थानांना आर्थिक पाठबळ देणे गरजेचे आहे आणि त्यातून त्या संस्था सक्षमपणे चालवाव्यात असा संकेत आहे. एका वर्षात बँकेने 80 कोटी नफा मिळवला कारण आम्ही व्यवसाय केला आहे. आम्ही ग्राहकांच्या व शेतकऱ्यांच्या दारात जास्त असतो त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक वाढली आहे. प्रास्ताविक राजू चव्हाण यांनी केले तर आभार मोहन पिसे यांनी मानले. 

या प्रसंगी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget