सोलापूर // प्रतिनिधी
किडनाशक उर्वरित अंश व किड रोगमुक्त उत्पादनाची हमी देण्यासाठी अपेडाने निर्यातक्षम बागांच्या नोंदणीसाठी ग्रेपनेट, मँगोनेट, अनारनेट, सिट्रसनेट व व्हेजनेट या प्रणाली विकसित केलेल्या आहेत. या अंतर्गत शेतकऱ्यांना नोंदणी व नुतनीकरणासाठी अपेडाने विकसीत केलेल्या सुधारीत मानंक पद्धतीमधील ॲनेक्झर 1 नुसार शेतकऱ्यांनी निर्यातक्षम पिकांची नोंदणी मोबाईल ॲपद्वारे करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.
यापूर्वी ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे विहित प्रपत्रात अर्ज सादर केला जात होता. यावर्षी राज्याच्या निर्यातीस चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम बागांच्या नोंदणीचा लक्षांक कृषी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेला आहे.
कोविड-19 या महामारीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे जाणे-येण्याच्या अडचणीपासून मुक्तता मिळण्यासाठी फलोत्पादन विभागाने अपेडा कार्यालयामार्फत फार्म रजिस्ट्रेशन कनेक्ट मोबाईल ॲपद्वारे निर्यातक्षम बागांच्या नोंदणीसाठी संबंधित अधिकारी, सहभागी संस्था व प्रगतशील शेतकऱ्यांसाठी 24 ऑक्टोबर 2020 रोजी राज्यस्तरीय वेबिनारद्वारे कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेमध्ये निर्यातक्षम बागांच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी ॲन्ड्रॉईड मोबाईल ॲपमध्ये गुगल प्ले स्टोअरद्वारे अपेडाने विकसीत केलेले फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यासाठी http://play.google.com/store/
राज्यातील फलोत्पादन उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यातक्षम बागांची नोंदणी मोबाईल ॲपद्वारे करून जास्तीत जास्त कृषी उत्पादित मालाची निर्यात करावी. काही अडचणी आल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. माने यांनी केले आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.