सिना-माढा योजनेच्या नलिका दुरुस्तीचे काम तातडीने पुर्ण करावे:- आ.बबनराव शिंदे यांची जलसंपदा मंत्र्याकडे मागणी

 


सोलापूर // प्रतिनिधी 

माढा तालुक्यामध्ये ऑक्टोंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील सिना-माढा उपसा सिंचन योजनेची उर्ध्वगामी नलिका  ही जमिनीपासून वर उचलल्यामुळे नादुरुस्त होऊन विविध ठिकाणी तुटल्यामुळे त्याची दुरुस्ती तातडीने करुन द्यावी अशी मागणी आ.बबनराव शिंदे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेकडे केली आहे.


याबाबत अधिक माहिती देताना आ.शिंदे यांनी सांगितले कि, दि. 13 व 14 ऑक्टोंबर रोजी सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. माढा तालुक्यामध्ये सर्वच महसूल मंडळामध्ये 150 मिली मिटर पेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतातील उभी पिके,जमीनी वाहून गेलेल्या आहेत. त्यामध्ये सिना-माढा उपसा सिंचन योजनेचेही  नुकसान झालेले आहे. योजनेच्या फुटजवळगांव ता. माढा येथील पंपहाऊस पासून तीन लोखंडी नलिकाव्दारे पाणी उचलून पुढे पाणी वितरीत करण्यात येते यापैकी उर्ध्वगामी नलिका क्रं.2 ही पाण्याच्या अतिदाबामुळे 2 कि.मी परिसरामध्ये सुमारे तीन फुटापासून सहा फुटापर्यंत जमीनीपासून वर उचलली गेली असल्यामुळे विविध ठिकाणी वेल्डींग तुटलेले आहेत त्यामुळे पाणी गळती मोठया प्रमाणावर  झाल्यास भविष्यात  मोठे नुकसान होणार असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले.


काही दिवसांपुर्वी आ.बबनराव शिंदे यांनी सिना माढा योजनेचे कार्यकारी अभियंता आर.पी.मोरे, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता यु.पी. जाधव,सेवानिवृत्त  अधिक्षक अभियंता, बी.डी तोंडे, सबंधित उप अभियंता,  यांचेसमवेत  प्रत्यक्ष पाहणी करुन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता व्हीं.जी.  रजपूत, अधीक्षक अभियंता धीरज साळे यांना दुरुस्तीबाबत  सुचना देऊन येणाऱ्या काळात पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचे सांगितले होते.


सिना माढा योजना पुर्ववत सुरु करणेसाठी नादुरुस्त झालेली पाईपलाईन दुरुस्त करून बसवून त्यावर सिमेंट क्राँक्रीटचे अँकर ब्लॉक बसविणे आवश्यक असल्याचे सांगत दुरुस्ती केल्याशिवाय रब्बीचे आवर्तन शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे आ.शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत तातडीने दुरुस्ती करणेसाठी मध्यवर्ती चित्र संघटना नाशिक व कार्यकारी संचालक,महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ,पुणे यांना  आदेश द्यावेत अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली असल्याचे आ.बबनराव शिंदे यांनी सांगितले.


चौकट- सिना माढा योजनेच्या दुरुस्ती करिता फुटजवळगाव ता.माढा येथील पंपहाऊसमध्ये राखीव पाईप ठेवण्यात आले होते. परंतू  काही वर्षापूर्वी सदरचे पाईप कवडीमोल किमतीत महामंडळाची परवानगी न घेता संबंधीत अधिकाऱ्यांनी विकले आहेत. त्यांची सखोल चौकशी करुन जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणेची मागणी आ.शिंदे यांनी केली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget