भाजपचे माजी खासदार संजय काकडे पत्नीसह गायब!


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

मेव्हण्याला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणात माजी खासदार संजय काकडे व उषा काकडे यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र ते स्वतःहून हजर न झाल्याने त्यांना न्यायालयात घेऊन जाण्यासाठी चतु:श्रृंगी पोलिसांचे पथक त्यांच्या घरी आणि कार्यालयात गेले होते. परंतु ते त्या ठिकाणी सापडले नाहीत. त्यामुळेेे काकडे दांपत्य नेमके कुठे गायब झाले याचा तपास पोलिस करत आहेत.   गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी युवराज ढमाले (वय 40) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. संजय काकडे आणि फिर्यादी यांच्यामध्ये सुरुवातीला भागीदारीत व्यवसाय होता. मात्र त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे 2010 पासून दोघेही स्वतंत्ररीत्या व्यवसाय करतात. ऑगस्ट 2018 मध्ये फिर्यादी संजय काकडे यांच्या घरी गेले असता काकडे यांनी त्याला, ''तुला संपवायला वेळ लागणार नाही, तू पैशाचा माज येऊ देऊ नकोस, तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुपारी देऊन संपवेल'', अशा शब्दात धमकी दिल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.याबाबत काकडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. मेव्हणा युवराज ढमाले याने माझ्या विरोधात तक्रार दाखल केल्याचे समजल्यावर वाईट वाटले आहे. ''गेल्या तीन वर्षात मी ढमाले याला केवळ दोनदाच भेटलो आहे, ते ही एकदा माझ्या वाढदिवसादिवशीच. मात्र, हे एक राजकीय षडयंत्र आहे. कोणत्याही प्रकारची कल्पना न देताच पोलिसानी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. यातून त्यांच्यावर राजकीय दाबाव असल्याचे दिसून येते,'' असे ते म्हणाले होते. तर ढमाले यांनी देखील याबाबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यात ते म्हणाले होते की, “माजी खासदार संजय काकडे यांनी मला 2018 मध्ये जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मी शांत बसलो कारण मला दोन लहान मुले आहेत. मी माझा व्यवसाय करीत राहिलो. मात्र तरी देखील मागील तीन वर्षात माझ्यापर्यंत अनेक गोष्ट येत राहिल्या, खूप अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर अखेर मी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार माझे भाऊजी माजी खासदार संजय काकडे आणि बहीण उषा संजय काकडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मला जीवे मारण्याची धमकी देण्याचा त्यांचा एकच हेतू दिसून येतो की, मी त्यांच्यापुढे जाऊ नये. तसेच या कौटुंबिक वादामुळे हे सर्व घडले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget