पुळूजच्या श्री.पांडुरंग ताटे यांना पितृशोक,भीमा परिवारातर्फे संग्राम चव्हाण यांचेकडून सांत्वन भेट




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

पुळुजचे श्री. पांडुरंग ताटे यांचे वडील श्री.श्रीधर भगवान ताटे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.कै. श्री ताटे यांनी सलग 30 वर्षं आळंदी वारी करून सांप्रदायिक क्षेत्रात समृद्ध  वारसा  जोपासला. कुस्ती क्षेत्रातही त्यांनी स्वतःची चांगली ओळख निर्माण केली होती. तसेच ते हाडाचे शेतकरीही होते. कै. भिमराव दादा यांनी उभा केलेल्या महत्त्वकांक्षी प्रल्हाद पाणीपुरवठा योजना संस्थेचे ते चेअरमन होते. तसेच पन्नास वर्षांपूर्वी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला होता. ते कै. भिमरावदादा महाडिक यांचे निकटवर्तीय सहकारी होते. जातिवंत खिलार जनावरे जोपासण्याचा त्यांचा हातखंडा होता. त्यांच्यामागे एक मुलगा व चार मुली असा परिवार असुन पुळुजचे भीमा परिवाराचे प्रवक्ते तसेच खासदार धनंजय महाडिक यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणाऱ्या श्री. पांडुरंग ताटे यांचे ते वडील होते. भीमा परिवाराचे संघटक व समन्वयक प्रा. संग्राम चव्हाण यांनी भीमा परिवारातर्फे श्री. ताटे यांच्या पुळुज येथील निवासस्थानी भेट घेऊन ताटे कुटुंबीयांचे सांत्वन केले.



यावेळी पुळुज येथील श्री.मधुकर दिगंबर बाबर डेप्युटी सरपंच,श्री दगडू डोंगरे ,गाव कामगार तलाठी श्री.गायकवाड श्री.गायकवाड ,कृषी सहाय्यक श्री. प्रक्षाळे, ग्रामसेवक श्री. कोळी, विमा अधिकारी पांडुरंग सावंत, पैलवान संजय बाबर, भाऊसाहेब पाटील, संताजी भोसले, शिवाजी सगर आदी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget