सेतूबंध प्रतिष्ठान २०१९ चे साहित्य पुरस्कार जाहीर




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

तंञज्ञानाच्या जोखडात अडकून पडलेल्या माणसाला वाचते करण्याचे निरंतर प्रयत्न करत, यशस्वी वाटचाल करत पुस्तकांची फिरती चळवळ उभी करून वाचक व पुस्तक या दोघांमधील दुवा म्हणून अविरत कार्यरत  असलेल्या सेतूबंध प्रतिष्ठान पुळूज ( ता. पंढरपूर ) यांच्या वतीने सेतूबंध साहित्य पुरस्कार २०१९ साठी आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. यामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांतून देखील प्रस्ताव दाखल झाले होते. 

सेतूबंध प्रतिष्ठान साहित्य पुरस्कारासाठी प्राप्त सर्व साहित्यकृतींपैकी निवड समितीकडून आलेल्या निर्णयानुसार सेतूबंध साहित्य पुरस्कारांने पुरस्कृत करण्यात येत आहे. 


सदर पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी  १०००/- रु. रोख, सन्मानपञ असे आहे. सेतूबंध प्रतिष्ठानचा साहित्य पुरस्कार वितरण सोहळा कोरोनाचे समूळ उच्चाटन झाल्यानंतरच संपन्न होणार आहे. तशी माहिती पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना योग्य वेळी कळविण्यात येईल. 


२०१७- २०१८ या वर्षीचे सेतूबंध साहित्य पुरस्कार खालील साहित्य कृतींना प्रदान करण्यात आले होते. 


• नोंदीनांदी ( कवितासंग्रह ) फेलिक्स डिसोझा

• मुक्या जंगलाची गर्जना ( कथासंग्रह ) अर्जुन व्हटकर

• शेतकरी नवरा ( कादंबरी ) मेघा पाटील

• देवलसी संत बहेणाई ( संतसाहित्य ) श्रृतीश्री वडगबाळकर

• भंगार ( आत्मचरित्र ) अशोक जाधव 


२०१९ या वर्षीचे सेतूबंध साहित्य पुरस्कार खालील साहित्य कृतींना प्राप्त झालेले आहेत. 


• मुखवटा उतरवल्यावर ( कवितासंग्रह ) योगिनी राऊळ- विभागून

• दिवस बोलू देत नाहीत ( कवितासंग्रह ) गजानन फुसे- विभागून

• फिंगर बाऊल ( कथासंग्रह ) विठ्ठल गावस

• यसन ( कादंबरी ) ज्ञानेश्वर जाधवर 


सेतूबंध प्रतिष्ठानकडून वितरित करण्यात येत असलेल्या व निवड समितीकडून आलेल्या या साहित्य पुरस्कारांची घोषणा करतेवेळी सेतूबंध प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. शिवाजी भोसले उपाध्यक्ष श्री. श्रीशैल शिरोळकर, सचिव सौ. माधुरी भोसले, सदस्य श्री. शिवदास कुंभार, श्री. श्रीकांत बाबर, श्री. धोंडीराम देठे, श्री. उमेश बाबर समन्वयक सूर्याजी भोसले  इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget