‘क्लोरल हायड्रेट’ विषारी द्रव्याचा समावेश, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
सोलापूर // प्रतिनिधी
‘क्लोरल हायड्रेट’ हे विषारी द्रव्य मिसळून तयार करण्यात येणार्या रासायनिक ताडीचे घरगुती विक्रीचे प्रमाण वाढलेले आहे.
गोदुताई नवीन विडी घरकुल व हैदराबाद रोड,जुना विडी घरकूल सागर चौक (विजय मारुती मंदिरसमोर),रविवार पेठ (कुचन प्रशालेच्या बाजूस),गवळी वस्ती (आकाशवाणी केंद्रामागे),
चाकोतेनगर (विडी घरकुलच्या पाठीमागे), नीलमनगर, विनायकनगर, सुनीलनगर येथे होत असल्याचे माहिती मिळाली आहे.
ही ताडी आरोग्याला अपायकारक असून पिणार्या शौकिनांची गर्दी वाढतच आहे.
शहरातील झोपडपट्टी परिसरात अशी घरगुती केंद्रे फोफावत आहेत.
तरुण पिढी ताडीच्या व्यसनात अडकत असून अशा अनधिकृत ताडी विक्रीवर पायबंद घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
सोलापूर शहर व ग्रामीणमध्ये हैदराबाद रोड,जुना विडी घरकूल सागार चौक विजयमारूती परिसर शांती चौक,गांधी नगर अक्कलकोट रोड, अशोक चौक गोदुताई नवीन घरकुल आदी भागात रासायनिक ताडी विकत आहेत.
या ठिकाणी 20 रुपये प्रती लिटर ताडी विक्री होत आहे.
एका ताडी दुकानात दररोज सुमारे बाराशे ते पंधराशे लिटर ताडी विक्री होते.
यावरून ताडी पिणार्यांची संख्या किती हे लक्षात येते.
शहर व ग्रामीण भागात अलीकडे अशी घरगुती ताडी विक्री वाढलेली आहे.
घरगुती ताडी 20 रुपयास तांब्या भरून मिळते.
त्यामुळे अशा ठिकाणी ताडी शौकिनांची गर्दी वाढत आहे.
घरगुती रासायनिक ताडीच्या विक्रीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.