सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूर शहरामध्ये कचरयाचे साम्राज्य मोठयाप्रमाणात वाढत आहे. यामुळे परिसरामध्ये घाणीचे व दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे डासांंचे प्रमाण वाढले असून यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. तसेच ज्या भागात कचरा साचलेला आहे तेथील बाजूबाजूच्या नागरीकांच्या घरामध्ये कचरा वारयामुळे जात आहे. याबाबत नागरीकांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे तक्रारीचे निवेदन दिलेले होते.
त्यानुसार आमदार प्रणिती शिंदे यांनी सोमपा मा. आयुक्त यांना सोलापूर शहरातील कचरयाची तात्काळ विल्हेवाट लावण्यात यावी याबाबत निवेदनाव्दारे मागणी केली आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.