सोलापूर // प्रतिनिधी
भागीरथी महिला संस्थेच्या वतीने 6 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत येथील कावळा नाका परिसरातील कार्यालयात दिवाळी मुळवा चे आयोजन करण्यात आली आहे. त्यामुळे सोबत महिला बचत गटाची स्टॉल्स उभारण्यात येणार असून, ग्राहकांना खरेदीचा तर मुलांसाठी फनफेअर आणि फनी गेम्सचा आनंद लुटता येणार आहे.
अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भागीरथी महिला संस्था गेली 15 वर्षे महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत आहे.
महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी वगैरे ती महिला संस्थेच्या वतीने 6 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत कोल्हापुरातील कावळा नाका येथील संस्थेच्या कार्यालयात दिवाळी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या दिवाळी महोत्सवात महिला बचत गटाची स्टॉल उभारण्यात येणार आहेत.
त्यामध्ये तोरण, आकाश दिवे, पणत्या, साबण, उटणे, परफ्युम, सिल्क साडी, कॉटन साडी, ड्रेस मटेरियल, कुर्तीज, गाऊन, लहान आणि मोठ्यांसाठी रेडीमेड कपडे, होम डेकोर, बेडशीट, पडदे, रजई, तर दिवाळीसाठी खमंग फराळ, तसेच चटणी, लोणचे पापड, रांगोळी, पर्स, फॅन्सी पाऊच, म्युरल्स, डेकोरेटिव्ह शो पीस, इमिटेशन ज्वेलरी यांचा समावेश आहे, यामुळे जिल्ह्यातील अनेक बचत गटांना आर्थिक फायदा मिळणार आहे. यातून महिलांच्या कलागुणांना वावा मिळणार आहे.
या महोत्सवाचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असा आव्हान भागीरथी महिला संस्था अध्यक्षा सौ. अरुंधतीताई महाडिक यांनी केले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.