बहुआयामी व्यक्तिमत्व भारत (नाना) भालके




पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील बहुआयामी नेतृत्व गमावले असून भारत नाना भालके म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील एक वेगळ्या प्रकारचे रसायन होते.

नानांनी प्रथमता 2004 साली शिवसेनेकडून निवडणूक लढविली. त्यानंतर नानाने आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये कधीही मागे फिरून पाहिले नाही त्याचप्रमाणे भारत नाना भालके यांच्या नावा मागेच यश होते. भारत नाना भालके म्हणजे विठ्ठल सहकारी साखर कारखाना विठ्ठल सहकारी साखर कारखाना म्हणजे भारत नाना भालके हे एक मोठे शास्त्र होऊन गेले होते. भारत नाना भालके यांच्या प्रगती पथाचा जर आपण आढावा घेतला तर, नानी 2004 नंतर 2019 पर्यंत सर्वच निवडणुकांमध्ये पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात विजय प्रस्थापित केला होता. 2009 लातर भारत नानांनी चक्क, राज्याचे उपमुख्य मंत्री राहिलेले विजयसिंह मोहिते-पाटील यांचा दारुण पराभव केला होता त्यानंतर 2014 त्यावेळेस पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली त्यावेळेस भारत नानांनी प्रशांत परिचारक यांचा  मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला. त्यानंतरच्या गत वर्षीच्या निवडणुकीमध्ये हे त्यांनी पंचवीस वर्षे पंढरपूर तालुक्यात आमदार की केलेले कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचा पराभव केला. त्याचबरोबर पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा नानांनी आपली ताकद दाखवून या निवडणुकीमध्ये सत्तांतर घडवून आणले होते एका बाजूला पंढरपूर तालुक्यांमध्ये प्रतिष्ठित असे घराणे असताना त्यांना तिन्ही विधानसभा निवडणुकीमध्ये पराजय चव चाखायला लावली होती. नानांचे वक्तृत्व हे खूप धाडसी वरांगडे असे होते कोणत्याही कामांबाबत नानांना कोणीही ही सर्वसामान्यांमधून फोन केला तर नाना त्यांचे काम लगेचच करायचे. त्यांच्याकडे कामाचा फार मोठा निपटारा करण्याची ची किमया होती.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील प्रश्नाबरोबरच नानांनी, इतनी मतदारसंघातील अनेक प्रश्न चुटकीसरशी मार्गी लावले होते.



 *(नानांचा आबालवृद्धांना आधार)* 


लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांना नाना आदराने बोलत व त्यांचे सर्व प्रश्न समजून घेऊन ते प्रश्न चुटकीसरशी सोडवीत असत.

याबाबतीत मंगळवेढा तालुक्यातील पूर्व भागातील काही ज्येष्ठ मंडळींनी सुद्धा याबाबतीत आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.लहान मुलांचे शाळेचे प्रश्न असो व या पुस्तकाचे प्रश्न असो किंवा एखाद्या नवतरुण तरुणीचे शैक्षणिक प्रवेशाचे  महाविद्यालयाचे प्रश्न असो भारत नानांनी जर कोणी फोन केला तो प्रश्न सुटलाच म्हणून समजा अशी नानांची एक खुबी होती.


भारत नाना भालके म्हणजे एक गोरगरिबांच्या आधारवड होते पंढरपूर शहरातील फुल व प्रसादिक वस्तू विक्रेत्यांचा प्रश्न असो किंवा पार्किंगच्या जागेचा प्रश्न असतो किंवा मंदिर परिसरातील इतर कोणते प्रश्न असो भारत नाना भालके हे अधिकाऱ्यांना सहजासहजी सोडत नव्हते याचे उत्तम उदाहरण म्हणजे पंढरपूर शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ या फूल विक्रेत्यांना एका पोलीस अधिकाऱ्याने एका वृद्ध महिलेला शिवीगाळ केली होती त्यावेळेस भारत नानांनी तुझे एका बुक्कीत दात पाडीन अशी त्यावेळेस त्या पोलिस अधिकाऱ्याला दिली होती पण पंढरपूर शहराचे एवढे मात्र दुर्दैवी की त्याचे सुद्धा राजकारण झाले. त्याचबरोबर नानांचे असे अनेक किस्से आहेत की ते सर्वसामान्य माणसांना सुद्धा माहिती नसावेत. पंढरपूर व मंगळवेढा या तालुक्यांमध्ये ज्यावेळी कोरोणाची महाभयंकर ची लाट आली त्यामध्ये भारत नानांनी लाॅकडाऊनच्या काळामध्ये, अनेक गोरगरीब कुटुंबांना आर्थिक मदत करून आपली व्यवहार्यता दाखवून दिली आहे.



मंगळवेढा तालुक्यातील 35 गावाचा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न असो मंगळवेढा तालुक्यातील रखडलेले रस्ते असो अथवा पंढरपूर व मंगळवेढा शहरातील कोणीही गोरगरीब नागरिकाची ची नगरपालिकेची कामे असो, नानांनी आपल्या कामातून या सर्व गोष्टींचा योग्य प्रकारे निपटारा करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे फार मोठे काम केले आहे.


२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी भारतीय जनता पार्टी चे केंद्रात व राज्यात सरकार असताना सुद्धा भारत नानांनी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी खासदार शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता त्यावेळी सर्व स्तरातून त्यांचे स्वागत करण्यात आले होते आणि 2019 च्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस नानांनी विजयश्री खेचून आणली त्यावेळेस त्यांनी एकच वाक्य उद्गारले होते की "मी शरद पवारांचा पट्ट्या आहे" पाच वेळा निवडून आल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. पण ही गोष्ट नियतीला मान्य नव्हती म्हणून नानांचे दुःखद निधन झाले आहे ही गोष्ट आमच्यासारख्या एका पत्रकार +कार्यकर्त्याला अजूनही खरी वाटत नाही.

भारत नाना भालके यांचा जनसेवेचा व लोक कल्याणाचा वारसा त्यांचे पुत्र भरत दादा भालके यांनी पुढे समर्थपणे चालवावा व पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघातील सर्व मतदारांबरोबरच विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातील सर्व ऊस उत्पादक सभासदांना न्याय द्यावा हीच खरी भारत (नाना) भालके यांना श्रद्धांजली होईल.

Tags

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget