सोलापूर प्रतिनिधी:- संपूर्ण वीज बील माफी झालीच पाहिजे, कोण म्हणतय देत नाही घेतल्याशिवाय देत नाही, अशी जोरदार घोषणाबाजी करत मोहोळ तालुका भाजपाच्या वतीने वीज बिलांची होळी करण्यात आली. मोहोळ वीज मंडळाच्या कुरुल रोड कार्यालयाच्या समोर हे आंदोलन नूतन तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण यांच्या नेतृत्वा खाली करण्यात आले. सोमवारी दि. २३ नोवेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र भर वीज बील माफी आणि होळी यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा एक भाग म्हणून मोहोळ येथे हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, संतोष ( आण्णा )पाटील, लोकसेवक संजय क्षीरसागर, माजी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश सोवनी, सुशील क्षीरसागर,पांडुरंग बचुटे, विष्णुपंत चव्हाण, सागर शंकरराव वाघमारे, बाळसाहेब सोनटक्के,दीपक पुजारी, पंकज चव्हाण,आनंद गावडे,गुरुराज तागडे, पैलवान भारत आवारे, पैलवान सुनिल पाटील, पैलवान मारुती चवरे, श्रीकांत लांडगे, सौदागर खडके, पैलवान सर्जेराव चवरे, जगन्नाथ वसेकर, मुजीब मुजावर, माजी जिल्हा चिटणीस सतीश पाटील, बाळासाहेब पवार, तानाजी बनसोडे, औदुंबर वाघमोडे, युवा नेते गणेश झाडे आदिंसह १०० ते १२५ कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.