आंतरजातीय विवाह करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील १८१ जणांना मिळाले ९० लाख



सोलापूर // प्रतिनिधी 

गतवर्षी २०१ वधू-वरांनी आंतरजातीय विवाह केला. पन्नास हजार रुपयांच्या शासकीय अनुदानासाठी २०१ दाम्पत्यांनी समाज कल्याण विभागाकडे अर्ज दाखल केला. यातील १८१ दांपत्य योजनेच्या अनुदानासाठी पात्र ठरले. उर्वरित २० दांपत्य विविध त्रुटीअभावी अपात्र ठरले. १८१ लाभार्थींना ९० लाख १५ हजारांचे अनुदान मिळाले.  मागासवर्गीय तसेच सवर्ण वर्गातील वधू-वरांचा विवाह झाल्यास आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत राज्य आणि केंद्र सरकारकडून विशेष अनुदान दिले जाते. चालू वर्षात या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ४० दाम्पत्य पात्र ठरले आहेत. राज्य सरकारकडून अनुदान प्राप्त न झाल्याने या ४२ लाभार्थीं चालू वर्षात अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget