मनसेची मागणी मान्य करीत सरकारने मंदिर उघडण्याचा घेतला निर्णय

 


सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या सोबत गेलेल्या शिष्टमंडळास आले यश

पंढरपूर प्रतिनिधी:- आगामी कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायाची भूमिका योग्य असून ती शासनापर्यंत पोचवण्यासाठी  आपण स्वतः प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  वारकरी संप्रदाय कार्तिकी यात्रा समन्वय समितीच्या शिष्टमंडळास  दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने मंदिरे उघडण्याची घोषणा केल्यामुळे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या सोबत गेलेल्या त्या शिष्टमंडळाच्या मागणीस यश मिळाले आहे.


      वारकरी संप्रदाय कार्तिकी यात्रा समन्वय समिती शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत कृष्णकुंज येथे बैठक पार पडली होती.यामध्ये आषाढी यात्रेसाठी वारकरी संप्रदायाने अनेक निर्बंध सोसत शासनास सहकार्य केले होते.मात्र आता बाजारपेठांसह सर्व गोष्टी खुल्या  होत असताना येत्या कार्तिकी  यात्रेसाठी शासनाने निर्बंध लादू नयेत या करिता  स्वतः संप्रदायाने कार्तिकी यात्रा नियोजन आराखडा तयार केला आहे.त्यानुसार यात्रा पार पाडावी. अशी मागणी पत्रकार परिषदेद्वारे केली होती. त्यास प्रतिसाद देत वारकरी संप्रदायाला चर्चेसाठी आमंत्रित करत संप्रदायाची भूमिका राज ठाकरे यांनी समजून घेतली.


या बैठकीस मनेसेच बाळनांदगावकर,नितीन सरदेसाई, दिलीप धोत्रे, राणा महारास वासकर, चैतन्य महाराज देहूकर, निवृत्ती महाराज नामदास, भागवत महाराज चवरे, रंगनाथ महाराज राशीनकर, विठ्ठल महाराज चवरे, भरत महाराज आलीबागकर,श्याम महाराज उखळीकर आदी उपस्थित होते.

   मनसेने सध्या अनेक उपयुक्त प्रश्नाबाबत आवाज उठवीत सरकार कडे पाठपुरावा करून मागणी मान्य करण्याचा सपाटा सुरू केला आहे.त्यामुळे राज ठाकरे यांनी याबाबत महाविकास आघाडीचे नेते खा. शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी सविस्तरपणे चर्चा करून मंदिरे उघडण्याची मागणी केली होती. 

 सध्या सक्षम विरोधक म्हणून अनेक घटकातील लोक आपल्या समस्या सोडवून घेण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे ओढा वाढू लागला आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget